जिकडे पाहावे तिकडे बाई । हरिविण दुजे नाही । एका जनार्दनी हरी कृष्ण कोठे पाहू पाणीयासी कैसी आता । एकली मी जावू । एकली मी जावू कैसी एकली मी जावू ॥धृ॥
कुंभ घेऊनिया शिरी । जात होते यमुना तीरी । वाटेवरी उभा हरी यासी काय देवू ॥१॥
मुरली घेऊनिया करी । वाजवितो श्रीहरी । नाद येतो कर्ण द्वारी कोठे याला पाहू ॥२॥