कशी सांग येवू । सोडू उंबरा घराचा । मला छंद लागे भारी । तुझ्या बांसरीचा । सांवळे हे रुप तुझे दिसे मनोहर । चरणी सुवर्ण पैंजण शोभती अपार । नाद लाग रात्रंदिन हा तुझ्या बांसरीचा ॥ मुकुटमणी हा जडिताचा । मयुरपिसे लखलख । कसे पीतांबर जरतारी कुंडलेच कानी डुलती । कंठी शोभे पुष्पहार तुरा तुळशीचा । करीन पूजा अखंडित । पंचप्राण लावीन ज्योती । ओव्याळीन पंचारती देवा तुला सांजवात । घडो चरणाची ही सेवा । हाच हेतू कि मनी बासंरीच्या या नादाने कां न सुचे काम धंदा । गृही सासुरवाशी मी पाहतील जावा नणंदा । खंड ना च होवो सखया नित्य दर्शनाचा ।