राधिके ऐक जरा बाई । हरीचा संग बरा नाही ।
हरी हा थोराचा ग बाळ तुझ्यावर येईल नसता आळ ।
तुझी नच इतकी पुण्याई । हरीचा संग बरा नाही ॥१॥
पुरविले आज तुझे कोड । उद्या तो दुसरीलाही, छंद त्या नवा बाई ॥२॥
तयाला लावू नको नादी चोर तो तू अगदी साधी तु साधी ।
अजूनही सावधूत होई हरीचा संग बरा नाही ॥३॥
वयाचे ठेव जरा ध्यान । दे जरा जगाकडे कान ।
आणि तू सासूरवाशीण ही ॥४॥