कृष्ण गाथा एक गाणे जाणते ही वैरवरी, एक तारी सूर जाणे "श्री हरी जय श्री हरी" तू सखा तू पाठीराखा तू पाठीराखा तूच माझा ईश्वर ॥१॥
राहीला व्यापूनिया तूच माझे अंतर आळविते नाम ज्याला अमृताची माधुरी, पाहते मी सर्व ते कृष्ण रुपी भासते ॥२॥
रोज स्वप्नी माधवाच्या संगती मी नाचते, ध्यान रंगी रंगताना ऐकते मी बांसरी ॥३॥
तारीलेसी तू कन्हैया दीनवाणॆ बापुडे । हीन मीरा त्याहुनी भाव भोळे भाबडे, दे सहारा दे निवारा या भवाच्या संगरी ॥४॥
N/A