मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
आरती

आरती

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य



जय  त  त्वज्ञाननिधान । अनसूयात्रिनंदन ।
त्वत्पदपद्मावरून । पंचप्राण ओंवाळीन ॥१॥
करीं  कृ  पा मायबापा । वारीं सर्व पापतापा ।
निजमार्ग करीं सोपा । अनुकंपा पूर्ण करून ॥२॥
जें अ  त्य  द्भुत तव रूप । तें ह्या चित्तीं आपोआप ।
राहो, जें कामकोप । उपशमवी प्रगटून ॥३॥
तप  श्च  र्या हे आमुची । त्वत्स्मृती नित्य होवो साची ।
दुर्वासना मनाची । नुठवीं हेंची देयीं दान ॥४॥
गूण  भा  वें तूझे गावें । अनासक्तीनें मी वागावें ।
सत्संगा आदरावे । मज द्यावें हे वरदान ॥५॥
अनु  र  क्ती त्वत्पदीं व्हावी । विषयीं विरक्ती व्हावी ।
कष्ट येतां धृती व्हावी । सेवा बरवी घे हातून ॥६॥
तार  त  त्सद्ब्रह्मार्पण । असो संपूर्णाचरण ।
दृढ धरूं तव चरण । न मला त्वदन्य शरण ॥७॥

इति श्रीसप्तशतीगुरुचरित्रं समाप्तम्

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP