मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
अष्टाविंशोsध्याय:

अष्टाविंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


जो दू  री  त्यजि धर्मास । मायबापदेवगुरूस ।
निर्दोष स्त्रीपुत्रास । चोर असत्यवादी जो ॥१॥
जो नि  रं  तर अशुद्ध । हरिहरां करी भेद ।
हो पाखंड दुर्वाद । पंक्तिभेद करी खळ ॥२॥
मारी  य  त्नें जीवा क्रूर । जळी वनग्रामघर ।
विकी कन्या गोरस मंत्र । फिरवी विप्रअतिथीतें ॥३॥
जो निं  द  क श्राद्धातें । न करी फोडी कूपातें ।
तोडॆए मार्गाश्रयवृक्षातें । जेवी व्रतातें सोडून ॥४॥
जो वि  वा  पर्वणीं स्त्रीशीं । भोगी रमे परस्त्रीसी ।
करी विश्वासघातासी । दत्तदानासी घे पुन: ॥५॥
जो स्व  प्नो  पम सुखार्थ । मारणादि करी व्यर्थ ।
परतापी करी अनर्थ । नाडी नेणत दे औषध ॥६॥
तो प  ति  त होयी मांग । जो करी वृषलीसंग ।
करी स्नान संध्या त्याग । पंचयाग टाकून जेवी ॥७॥
जो हो  य  वृत्तिरत्नहर्ता । दुष्प्रतिग्रही दुर्भोक्ता ।
मद्य पीता ये हीनता । अनुतप्ता दोष थोडा ॥८॥
जो लु  च्चा  जिती विप्रास । हूं तूं करी पितृगुरूंस ।
तो होयी ब्रह्मराक्षस । हो वायस निमंत्राशीं ॥९॥
तो क  प्यु  दरीं जन्म घे । चोरूनि जो फळपत्र घे ।
जो धन चोरुनि धे । जन्म घे तो उंटाचें ॥१०॥
हो उ त्क्रा  न्ती नंतर । नरकवास घोर ।
ह्या योनी त्या नंतर । दंभकर बगळा हो ॥११॥
माशी  म  धुहर उंदीर । धान्यहर जळहर ।
चातक पशु तृणहर । स्वर्णहर कृमिकीट ॥१२॥
अदुर्ग  ती  आधीं भोगून । होतां पुण्यपाप समान ।
अंधपंग्वाद्यघचिन्ह । ये घेऊन येथें पुन: ॥१३॥
कृमी  श्व  खर जारकर्में । स्त्री नरां गती हे दुष्कर्में ।
जे वागती सत्कर्में । स्वधर्में तरती ते ॥१४॥
हो प  र:  स्वर दंपती । दोषी ऐसें गुरु बोलती ।
पुसे त्रिविक्रम निष्कृती । सांगती गुरु तया ॥१५॥
तरी  गृ  हीत ब्रह्मदंड । शरण विप्रां पापखंड ।
हो होतां पाप उदंड । कृच्छ्र मुंडपूर्वक कीजे ॥१६॥
शक्ति  ही  नें गोधन द्यावें । जप यात्रा होम करावे ।
शक्तें चांद्रायण करावें । गव्य प्यावें अनुतापें ॥१७॥
स्वात्म  त्वै  श्वर्ययुक्त । गुरु वारी सर्व दुरित ।
पितृत्यागेम हो पतित । होई पूत मासस्नानें ॥१८॥
पति  ता  नें तें ऐकून । म्हटलें मी झालों पावन ।
घ्या विप्रांत मेळवून । तें ऐकून गुरू म्हणे ॥१९॥
होउ  नि  नृप विश्वामित्र । सायासें झाला पवित्र ।
तूं हीन वेदापात्र । ये परत्र विप्रकुळीं ॥२०॥
तो आ  सं  न येतां स्त्रीला । स्पर्शभयें मारूं आला ।
गुरु म्हणे त्यजी न स्त्रीला । तो म्हणाला हीन होउं कीं ॥२१॥
ते त  या  अंगींची विभूती । लुब्धाहातीं धुवविती ।
ज्ञान जाउनी त्या ये भ्रांति । घराप्रति गेला सस्त्रीका ॥२२॥
प्रण  ति  करी त्रिविक्रम । म्हणे वारा माझा भ्रम ।
अंग धूतां ज्ञान उत्तम । जाउनी भ्रम त्या हो केंवी ॥२३॥
इतिश्री० प० प० वा० स० सारे कर्मविपाककथनं नाम अष्टाविंशो० ॥२८॥ग्रं० सं०॥३०४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP