प्रथमोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`
॥ प्रारम्भ ॥
॥ ॥ ॐ नम: श्रीगणेशाय ॥ श्रीसद्गुरवे नम: ॥ अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसारप्रारंभ: ॥ ॥
नम: श्री दत्तगुरवे हृद्वासोधौतिकारवे ॥
स्वात्मज्योति:प्रकाशाय सुखायानर्थशांतये ॥१॥
भूतं भ व्यं भवच्चास्माज्जायते येन जीवति ॥
लीयते यत्र तद्ब्रह्म श्रीदत्ताख्यं त्र्यधीश्वरम् ॥२॥
भक्ति ग म्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये ॥
संक्षेपेण स्फुटं वक्ति वासुदेवसरस्वती ॥३॥
ग्रंथीं वा सुदेव निमित्त । कर्ताकरविता दत्त ।
तत्पदीं ठेवीनि चित्त । चरित ऐकोत संत हें ॥४॥
हें मा नु नी जे वाचिती । किंवा भक्तीनें ऐकती ।
तेचि भवाब्धि तरती । उद्धरती निजकुळा ॥५॥
मना वा चा अगोचर । तो स्वच्छंदें हो गोचर ।
कलियुगीं यतीश्वर । नरसिंहसरस्वती ॥६॥
त्याचें च रित्र ऐकून । नामधारक ब्राह्मण ।
गाणगापुरीं दर्शन । घावें म्हणून पातला ॥७॥
प्राणी ऊ ष्मानें तापून । इच्छिती छाया जीवन ।
तैसा त्रितापें तापून । ये लक्षून निजजीवना ॥८॥
जो ऊ र्ध्व खालीं भरला । आंत बांहेर सांचला ।
नामधारक म्हणे त्याला । दत्ता मला भेट देई ॥९॥
तूंचि मू र्तिमंत ब्रह्म । त्रिमूर्ति तूं गुरू परम ।
कलियुगीं मंगलघाम । भक्तकामपूरक ॥१०॥
विशा ल तव सत्कीर्ती । परिसोनि केली विनंती ।
तव कर्णावरी न ये ती । वाटे खंटी सर्वज्ञा हे ॥११॥
जरी म ज तूं नेणसी । तरी सर्वज्ञ कीं होसी ।
किंवा मातें उपेक्षिसी । दयाळूसी साजे हें कीं ॥१२॥
मी अ ध: पाता जाईन । जरी देसी उपेक्षून ।
सेवा इच्छी कीं तव मन । तेणें होसी कीं दाता ॥१३॥
सेवा शा न ठेवून । मेघापरी दे जीवन ।
पूर्वीं जेवीं दिल्हें दान । बिभीषणध्रुवादिकां ॥१४॥
किं मु ख पसरितां । बाळापाशीं मागे माता ।
जरी बाळ मारी लाथा । तया माता टाकूनदे कीं ॥१५॥
तूंची म म माता पिता । तूंची एक कुळदेवता ।
भिन्नभाव येथें नसतां । कोण दाता मज दुजा ॥१६॥
नरे श्व र सेवकवंशा । रक्षी न धरितां आशा ।
तूं अस्मत्पूर्वजेशा । सर्वेशा कीं उपेक्षिसी ॥१७॥
मी इ त्थं भूत सर्व । कथितां ही नये द्रव ।
जेणें पाषाणा ये द्रव । तूं निर्द्रव होसी कैसा ॥१८॥
अशी प्रा र्थना करून । हो मूर्छित हें जाणून ।
दत्त चित्तीं प्रगटून । आश्वासन देयी स्वप्नीं ॥१९॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्थश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे चरितानुसंधानं नाम प्रथमोsध्याय: ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2016
TOP