द्विचत्वारिंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
तत्र स्थो दड्मानसयात्रा । करीं पंचक्रोशीयात्रा ।
शुक्लकृष्णपक्षयात्रा । नित्ययात्रा करी भावें ॥१॥
प्रत्य क्ष चि विश्वेश्वरा । भवानी हरिधुंडीश्वरा ।
दंडपाणी भैरववीरा । विघ्नेश्वरा गुहा देखी ॥२॥
तूं स्थी र चित्तें करीं यात्रा । स्थापीं लिंग तूं कुमारा ।
सुटतील येरझारा । असें म्हणोनी गुप्त झाला ॥३॥
बाळ उ ठोनी पाहत । त्या न दिसे, झाला गुप्त ।
हाची माझा गुरू म्हणत । करीतसे तो यात्रा ॥४॥
अवा च्य हो शिवलीला । इष्ट वर दे तयाला ।
दे तो तसें गुर्वादिकांला । तो झाला विश्वकर्मा ॥५॥
द्विज ते व्हां गुरु जसें । सांगे तें ते पाहे तसें ।
गुरुनाथा वंदीतसे । स्तवितसे सायंदेव ॥६॥
तूंची उ मापती होसी । मज दाविली येथ काशी ।
गुरु म्हणे त्वद्वंशासी । एकविंशीं घडे यात्रा ॥७॥
तूं स त्त म लोकीं होसी । आतां न सेवीं म्लेच्छासी ।
आणूनियां स्त्रीपुत्रांसी । आम्हापाशीं रहा सेवित ॥८॥
तो न म: स्कारुनी गेला । स्वकुटुंबा घेऊनि आला ।
स्तवि पुन: श्रीगुरूला । कानडीस्तोत्रालापें ॥९॥
त्याचा पु त्र नागनाथ । तया वर दे गुरुनाथ ।
सांगे सायंदेवा स्वस्थ । करीं अनंतव्रत आजी ॥१०॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे काशीयात्रानिरूपणं नाम द्विचत्वारिंशो० ॥४२॥ग्रं० सं०॥५८४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP