त्रयोदशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`
बाळ व र्य ज्ञानज्योति । कृष्णमाधवसरस्वती ।
सदान्म्दोपेंद्रयती । सातवा मी हे मुख्य शिष्य ॥१॥
अधू र्त सर्व शांत । गुरु ऐशां शिष्यांसहित ।
आले जन्मभूमीप्रत । हो माताही यतिवंद्या ॥२॥
विन न्ति करुनी नर । विश्वरुपा घरोघर ।
न्हेती देती गुरुवर । परपार मायबापां ॥३॥
तो प्र भू म्हणे भगिनीला । दंपतीभेद केला ।
त्वां लातिलें हो धेनूला । पती त्यजील कुष्ठी होसी ॥४॥
ते भू य: प्रार्थितां म्हणती । वृद्धत्वीं पति हो यति ।
कुष्ठाची करीन शांती । स्त्रियां पति गती न अन्य ॥५॥
असें त ये वेळीं तिला । सांगोन शिष्यमेळा ।
घेवोनि ये गोदावरीला । भूगोला उद्धरी जो ॥६॥
शिष्य मे ळवी आणिक । माधवारण्यसंज्ञक ।
ज्ञान देउनी सम्यक् । विशोक केला गुरूनें ॥७॥
गुरु च र्य पुढें येती । तेथ एका विप्रा पाहती ।
मराया ये गोदेप्रति । दगड पोटीं बांधोनियां ॥८॥
तया चा तो जाणून भाव । शिष्यां म्हणती घ्यारे धांव ।
शिष्यें धेवोनियां धांव । तयास जवळ आणिला ॥९॥
तो सा द्यं त पुसतां वदे । शूलपीडित मी प्राण दें ।
कुकर्म केलें पूर्वी मदें । त्याचें फल दे देव हें कीं ॥१०॥
नाहीं पु ण्य पूर्वापार । मी झालों भूमीभार ।
गुरु म्हणती अनिवार । दोष फार आत्मघातें ॥११॥
तूं म रु नको रोगावर । औषध देतों मी शीघ्र ।
ऐसें म्हणती गुरुवर । तंव ये विप्र सायंदेव ॥१२॥
तो तो ष वी श्रीगुरूसी । म्हणे द्विज मी कांचीवासी ।
गुरु म्हणती हा उपवासी । या द्विजासी जेवूं धावीं ॥१३॥
हें सा म्प्र त करीं काज । सायंदेव म्हणे हा द्विज ।
अन्नवैरी झाला आज । दोश ये मज हा मरतां ॥१४॥
अपू प दे म्हणती तया । तें मानून गुरुराया ।
भिक्षेला ने प्रार्थुनियां । द्विज शिष्यांसमवेत ॥१५॥
धू पा द्ये गुरुचे पाद । पूजी विधीनें वंदी पाद ।
जेववी सर्वां हो सानंद । झाला विगद तोही विप्र ॥१६॥
इतिश्री० प० प० वा० वि० स० गु० सारे विप्रशूलहरणं नाम त्रयोदश० ॥१६॥ग्रं० सं०॥१६१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2016
TOP