एकोनत्रिंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
बर वा प्रश्न ऐकून । गुरु म्हणे भस्में ज्ञान ।
दिधलें तें धूतां जाण । जाऊन हो अज्ञानी ॥१॥
पूर्व यु गीं वामदेव । क्रौंचवनीं घेयी ठाव ।
त्या पाहुनि घेयी धांव । दुर्भाव तो राक्षस ॥२॥
तो दु र्गं धांगीं तेव्हां । धरी भक्षूं वामदेवा ।
भस्म लागतां दुर्भावा । त्यजुनी भवा पूर्वां स्मरे ॥३॥
तृट्क्षु धा शांत झाली । म्हणे पंचवीस आपुलीं ।
स्पष्ट जन्में म्यां स्मरलीं । भूपकुलीं मी दुर्जय ॥४॥
धरु नि मी भोगीं स्त्रिया । राज्यामदें करूनियां ।
चारी वर्णांच्याही भार्या । भोगी वेश्या असंख्यात ॥५॥
अवि वा हिंतांही भोगीं । रजस्वलाही न त्यागीं ।
पुढें दैवें झालों रोगी । शत्रु वेगीं घेती राज्य ॥६॥
दुरा श यें पाप केलें । स्त्रियांनीं बहु शापिलें ।
क्षयरोगें ग्रासियलें । अंतीं आले यमदूत ॥७॥
अप यात् क्षय आयुष: । हें कळलें निर्दोष ।
मी मरतां यमपुरुष । न्हेती दोष क्षाळावया ॥८॥
भी दे श्रो त्रा यातना ती । पित्रांसह भोगुनी अंतीं ।
अंगीं शिश्नें हजार होतीं । प्रेतगती ये ती मला ॥९॥
तें गा त्र ही सोडूनी । मी चोवीस भोगीं योनी ।
ब्रह्मराक्षस होउनी । राहें वनीं सदां भुका ॥१०॥
ह्या प ञ्च विसाव्या जन्मीं । गजा खातांही भुका मी ।
स्पर्शमात्रें शांती तुम्हीं । दिल्ही तुम्ही साक्षाद्देव ॥११॥
गेले क्षु त्पिपासादि । याचा हेतू सांगा आधीं ।
वामदेव म्हणे शुद्धी । झाली आधी गेला भस्में ॥१२॥
भस्म स्प र्शें एक जाण । द्राविड जार ब्राह्मण ।
त्यजिला शूद्रें मारून । ये श्वान त्यावरि एक ॥१३॥
श्वस्प र्श नें तदंगस्थ । भस्म लागुनी झाला मृत ।
त्यातें न्हेती यमदूत । शिवदूत सोडविती ॥१४॥
त्या सा नं दें कैलासातें । न्हेतां यम आला त्यातें ।
धर्म सांगून विप्रातें । दूर न्हेते झाले तया ॥१५॥
शंभु च जाणे तन्माहात्म्या । भस्म लावीं मीं सर्वकाया ।
लागलें किंचित् तुझ्या काया । ज्ञान तयायोगें हो हें ॥१६॥
वदे र क्ष राज्य करितां । वापी केल्या निर्जळपंथा ।
विप्रांवृत्ति दिधल्या आतां । आलें हातां त्याचें फळ ॥१७॥
सांगे स विस्तर मला । भस्मधारण विधीला ।
वामदेव म्हणे शिवाला । प्रश्न केला हा कुमारें ॥१८॥
मग नं दीगौरीयुक्त । शिव बसे देवांसहित ।
सनत्कुमार वंदुनी तेथ । करीतसे हा प्रश ॥१९॥
भो व्या घ्रा जिनवास । चतुर्विध पुमर्थांस ।
देई शीघ्र असें आम्हांस । सांगा खास स्वल्प साधन ॥२०॥
त्यां म्ह ण तसे ईश । धारण करीं भस्मास ।
चतुर्विध पुमर्थांस । दे हें खास सुसाधन ॥२१॥
न ग मे ऐसें सुस्राधन । गोमयें अग्निहोत्रांतून ।
भस्म घेईं करीं धारण । भ्रूसमान त्रिपुंड्रेसी ॥२२॥
हो न व देवादिक । एका एका पुंड्री देख ।
मध्यांगुष्ठानामिका । काढीं रेखा शीर्षादिकीं ॥२३॥
हो हें च पापशमन । असें वामदेव सांगून ।
करवी भस्मधारण । उद्धरून गेला राक्षस ॥२४॥
गुरू अ सें सांगती । सर्व आनंदीत होती ।
गेला त्रिविक्रमयती । कथा पुढती सांगों ऐक ॥२५॥
इतिश्री० प० प० वा० स० सारे भस्ममहिमावर्णनं नाम एकोनत्रिंशो० ॥ग्रं० सं०॥३२९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP