मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
अष्टचत्वारिंशोsध्याय:

अष्टचत्वारिंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


जो हो  वे  दां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर ।
तयाग्रामीं भक्त शूद्र । नमस्कार करी नित्य ॥१॥
गुरु  दे  व संगमीं जाती । त्यां पाहून करी प्रणती ।
पुन: ये तो येणें रीती । करी भक्ती शेती करितां ॥२॥
लोकीं  च  मत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया ।
कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतों ॥३॥
तो तें  प्र  माण मानून । स्वामिभागा ठरवून ।
कापी, तत्स्त्री येऊन । करी विघ्न तरी न हटे ॥४॥
तें क  थि  ती अधिकार्‍यांसी । शूद्र न जुमानी त्यासी ।
दावी मध्यान्हीं गुरूसी । म्हणे शेतासी कापिलें ॥५॥
तूं अ  त:  पर काय खासी । असें गुरू पुसे त्यासी ।
म्हणे तुझ्या प्रसादेसी । लाभ आम्हासी होईल ॥६॥
त्याचे  पु  रवाया हेत । वृष्टी मूलक्षी पाडित ।
शतगुण त्या शेतांत । गुरुनाथ धान्य देती ॥७॥
तो क  रु  नी क्षेत्रपपूजा । सस्त्रीक करे गुरुपूजा ।
स्वामिभाग देउनि द्विजां । धान्यपुंजा वांटी हर्षें ॥८॥
संतो  षो  नी गुरुमूर्ति । त्याच्या वंशा गती देती ।
अशा लीला केल्या किती । त्यातें नेणती ब्रह्मादिक ॥९॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं नाम अष्टचत्वारिंशो० ॥४८॥ग्रं० सं०॥६४२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP