पञ्चमोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`
ये श्रा द्धा हीं विप्राघरीं । उत्तरदेशीं भिक्षा करी ।
श्राद्धापूर्वीं द्विजनारी । दान करी श्राद्धान्नाचें ॥१॥
दत्त वि प्रस्त्रीचा भाव । पाहुनी सुत स्वयमेव ।
झाला श्रीपादराव । गृहभाव स्वीकारीना ॥२॥
विशे ष विद्याभिज्ञ झाला । तात आरंभी विवाहाला ।
पुत्र म्हणे योगश्रीला । वरीं, अबला सर्व माता ॥३॥
निश्च य हा ते ऐकून । खिन्न होती त्या दावून ।
त्रिमूर्तीरूप, आश्वासून । बंधू दोन पंग्वंध जे ॥४॥
करी प्र भू त्यांवरी डोळा । चालूं लागला पांगळा ।
पाहूं लागला आंधळा । अतर्क्य लीला श्रीपादाची ॥५॥
आशीर् वा द देई तयां । काशीपुरा जाऊनियां ।
बदर्याश्रम पाहुनियां । श्रीपाद ये गोकर्णासी ॥६॥
विम ला: कीर्तयो यस्य । श्रीदत्तात्रेय एव स: ।
कलौ श्रीपादरूपेण । जयति स्वेष्टकामधुक् ॥७॥
इतिश्री० प० वा० स० सारे श्रीपादावतारकथनं नाम पंचमो० ॥५॥ग्रं० सं०॥६१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2016
TOP