द्वात्रिंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
पर तं त्र न रहावें । धवासवें सतीनें जावें ।
पदोपदीं मेधफल घ्यावें । स्थान पतिलोकीं ॥१॥
किंवा वि धवा धर्म । पाळितां ही ये शर्म ।
पोर असतां कीजे मर्म । राहिजे ब्रह्मचार्यापरी ॥२॥
स्वल्प मू लही असतां । पोटीं गर्भ असतां ।
पतिशव न मिळतां । सवें जातां दोष असे ॥३॥
ज्या मू ढा केश राखती । धवासह त्यां हो दुर्गती ।
अतएव मरतां पति । करो ती केशवपन ॥४॥
शय ना तें खाटेवरी । जी करी जाय ती नारी ।
नरकीं यास्तव भूमीवरी । निजो नारी एकाहारा ॥५॥
भूषा नु लेप तांबूल । त्यजुनी राखिजे शील ।
नेसावें शुभ्रचैल । मंगलस्नान वर्जावें ॥६॥
विष्णु प तिसम मानून । कीजे वैधव्य आचरण ।
न कीजे नरवीक्षण । चांद्रायण शक्त्या कीजे ॥७॥
अव श्यं भावि होईजे । त्याचा शोक नच कीजे ।
मासव्रत पाळिजे । माघ ऊर्ज वैशाखीं हो ॥८॥
सुम ति जी वागे ऐसी । सहगमनवत् फल तीसी ।
जायी घेउनी पतिसी । स्वर्गीं ऐसी गुरूक्ती हे ॥९॥
म्हणे प तिव्रता मातें । वैधव्य हें न रुचतें ।
तारुण्य हें विघ्नातें । देई असें मातें वाटे ॥१०॥
अव श्यं कुरु ऐसें । बोलुनी तो देतसे ।
चार अक्ष भस्म परीसें । म्हणतसे त्या सतीतें ॥११॥
हे भू ति शिरीं लावून । पतिकर्णी अक्ष बांधून ।
गुरुदर्शन घेऊन । सहगमन करीं मग ॥१२॥
तो आ ज्ञा अशी देवुन । गेला, साध्वी दानें देऊन ।
पतिशवा नेववून । अग्नि घेऊन पुढें चाले ॥१३॥
पाहु न नारी म्हणती । केश साडेतीन कोटी ।
होमुनी स्वर्गी घे ती । वर्षकोटी प्रतिकेशा ॥१४।
सर्व च मत्कार पाहाती । स्मशानीं ये मंदगती ।
अग्निसिद्ध करोनी ती । आठवी चित्तीं उपदेशा ॥१५॥
स्व च क्षु नें गुरु पाहून । म्हणे सहगमन करीन ।
विप्रें शीघ्र ये म्हणून । वदतां मनस्विनी गेली ॥१६॥
जैं उ ष: काळीं विजन । गजबजती तैसे जन ।
सवें येती गजबजून । गुरुस्तवन मार्गी करी ॥१७॥
सती य तीशा पाहून । करी साष्टांग नमन ।
पञ्च पुत्रा हो म्हणून । आशीर्वचन दे गुरू ॥१८॥
हें स्व तं त्र बोलतां जन । देती साद्यंत सांगून ।
गुरु प्रेता आणवून । करी स्नपन रुद्रतीर्थें ॥१९॥
तव तो उठोनी बैसला । नग्न म्हणूनी लाजला ।
सर्व लोकां हर्ष झाला । न मावला साध्वी देहीं ॥२०॥
दैव यो गें स्वर्णघट । रंका मिळतां अवचट ।
हर्ष हो तेंवी तिला स्पष्ट । उत्कट हो हर्ष तेव्हां ॥२१॥
प्रेम गि रा दोघें स्तविती । श्रीगुरु वर देती ।
गेले दोष ये सद्गती । लोहां गती जेवीं परिसें ॥२२॥
लिही न याला विधी लेख । धूर्त पुसे गुरु म्हणे ऐक ।
पुढचा शतायुष्य लेख । दिल्हा सम्यक् मागून मी ॥२३॥
मन श्चै त्य गुरु असें बोले । लोकीं जय शब्द केले ।
दंपतीनें स्नान केलें । मठीं आले गुरु त्यासह ॥२४॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिंशो० ॥३२॥ग्रं० सं०॥३८३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP