मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
चतुर्थोsध्याय:

चतुर्थोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`


बहु  वित्  सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांग मज ।
त्रीश केवीं हो अत्रिज । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥१॥
जाण  अ  त्रि ब्रह्मपुत्र । अनसूया तत्कलत्र ।
दंपती परम पवित्र । त्यांचा पुत्र दत्तात्रेय ॥२॥
निर्वा  ध  अनसूयेचें । व्रत पाहुनी तें साचें ।
मन भ्यालें सर्व सुरांचें । अबोधाचें बीज हें कीं ॥३॥
ते नि  श्चो  तत्धैर्य देव । त्रिमूर्तीपाशीं घेती धांव ।
आश्वासोनी त्यांते देव । भिक्षुभाव स्वीकारिती ॥४॥
ते ऊ  र्ध्व  लोक सोडुनी । भिक्षुकसे होवुनि ।
तिघे आले अत्रिसदनीं । जातां रानीं मुनिवर्य ॥५॥
त्यां कि  म्य  योजन ऐसें । अनसूया पुसतसे ।
नग्नभिक्षा दे तूं ऐसें । याचितसे देवत्रय ॥६॥
जरी  सृ  ती सोडिती ते । तरी सती वदे त्यांतें ।
तसीच मी तुम्हां देतें । स्वस्थचित्तें भिक्षा करा ॥७॥
स्वव्र  ता  च्या सामर्थ्यें ती । अत्रिपदा चिंती चित्तीं ।
अतिथी बाळ कल्पुनी ती । सती नग्न होती झाली ॥८॥
सुदु  स्त  र ज्यांची माया । सहसा बालत्व ये तयां ।
तें पाहून अनसूया । विस्मया पावली ती ॥९॥
सुहा  स्य  मुखी घे बालां । तंव स्तना पान्हा आला ।
पाजी एका एका बाला । जी विमला पातिव्रत्यें ॥१०॥
त्यांचीं  शा  न्त झालीं मनें । पतिव्रतास्तनपानें ।
पाळण्यांत घालुनि गाणें । ती प्रीतीनें गायी साध्वी ॥११॥
ती सु  खा  नें गातां मुनि । तेव्हां आला वनांतुनि ।
ज्ञानें त्रिमूर्ति जाणुनी । स्तवुनी तोषवी त्याला ॥१२॥
त्यांचें  गु  ज तें जाणुनि । राहिले सुत होउनि ।
निजरूपेंहि स्वस्थानीं । जाती तीनी देव हर्षें ॥१३॥
सगु  ण  त्वा आलें त्यांचीं । अत्रि नामें योजी साचीं ।
चन्द्र दत्त दुर्वासाचीं । ब्रह्म विष्णु महेश्वर ॥१४॥
चंद्र  प्र  णाम करूनी । चंद्रलोका गेला, मुनि ।
दुर्वासा फिरे भुवनीं । स्वसदनीं राहे दत्त ॥१५॥
तो नि  वृ  त्तिमार्ग दावी । भक्तांचें काम पुरवी ।
स्मर्तृगामी पुन: भुवि । अवतरे श्रीपादाख्य ॥१६॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थो० ॥४॥ग्रं० सं०॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP