पंचत्रिंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
मंत्रो प देश द्या मला । तेणें नित्य स्मरूं तुम्हांला ।
गुरु म्हणे स्त्री मंत्राला । पात्र न तिला पतिसेवा ॥१॥
अव श्य ऐकें ही कथा । देवीं दैत्यां रणीं मारितां ।
तयां संजीवनी जपतां । वांचविता होय भार्गव ॥२॥
अचि न्त्य मंत्रिविद्याशक्ती । इंद्र सांगे शिवाप्रती ।
आणवून शुक्राप्रती । उमापती भक्षीतसे ॥३॥
तो त्या चे मूत्रद्वारा । पडे वांचवी पुन: क्रूरां ।
बृहस्पती म्हणे इंद्रा । बुडवूं मंत्र षट्कर्णेशी ॥४॥
असें त या बोलून । स्वसुता कचा दे धाडून ।
कपटी शिष्य होवून । शुक्रा सेवून तो राहे ॥५॥
न वा स: शुभदो नोsस्य । असें मानुनी दैत्य ।
मारिती त्या वांचवी काव्य । द्विवार कन्यास्नेहें ॥६॥
दैत्य य त्नें त्या जाळून । त्याचें भस्म मद्यांतून ।
देती शुक्र पी नेणून । मग कन्या विरहें रडे ॥७॥
शुक्र दा ही दिशा देखे । शेखीं कचा पोटीं देखे ।
म्हणे देवयानी ऐकें । त्या आणितां मी मरेन ॥८॥
कन्या दि व्यमंत्र मागे । म्हणे कचा वांचवीं वेगें ।
मग मी तूतें मंत्रयोगें । बापा वेगें वांचवीन ॥९॥
देहा त्य जीन मी अन्यथा । अशी कन्योक्ति ऐकतां ।
आश्वासुनी मोहें पिता । मंत्र देता झाला तिला ॥१०॥
तो म ग जपे कचार्थ । तो ये त्याचें फोडुनी पोट ।
कन्या ताता उठवीत । कचा श्रुत झाला मंत्र ॥११॥
मंत्र तं त्र प्रगट होतां । तत्काळ ये निर्वीर्यता ।
शुक्रमंत्रा ये हीनता । आज्ञा घेता झाला कच ॥१२॥
कन्या ते व्हां वरीं म्हणे । विद्या देउनी दिल्हें जिणें ।
तूं भगिनी कच म्हणे । ती म्हणे विद्या विसर तूं ॥१३॥
कच जो रानें वदे तिला । विप्रावेगळा वरो तुला ।
शुक्र उपदेशी स्त्रीला । भ्रष्ट झाला मंत्र त्याचा ॥१४॥
ती द्वि ज पुत्री असतां । शापें झाली ययातिकांता ।
दोघां हानी मंत्र देतां । स्त्रिये व्रता आचरावें ॥१५॥
ती म ग म्हणे नाथा । व्रत एक सांगा आतां ।
गुरु म्हणे सोमव्रता । करितां सर्व सिद्धि होय ॥१६॥
हें स द्भा वें करीं परम । आर्यावर्ती चित्रवर्म ।
तया सीमंतिनीनाम । हो उत्तम कन्यारत्न ॥१७॥
तिये स चौदा वर्षें होतां । ये वैधव्य हें कळतां ।
तिनें मैत्रेयी प्रार्थितां । सोमव्रता ती सांगे ॥१८॥
निश्च य मनीं धरून । सोमवारीं उपोषण ।
किंवा नक्तभोजन । करिजे अर्चून गौरीशा ॥१९॥
दुरि ते ही नाशा जाती । सौभाग्य सुत राज्याप्ती ।
दे शीघ्र गौरीपती । अर्चितां त्या प्रदोषीं ॥२०॥
हो दु: खि त तरी व्रता । न सोडिजे सर्वथा ।
सीमंतिनी तें ऐकतां । करी व्रता दृढचित्तें ॥२१॥
दैवा लं घी कैसा कोण । चित्रांगदा ती देऊन ।
राजा गेहीं प्रेमें करून । घें ठेवून त्या जामाता ॥२२॥
बुडे य युनेंत जामाता । कन्या प्राण त्यजूं उठतां ।
वारुनि घरा न्हे पिता । तरी व्रता ती न सोडी ॥२३॥
मह च्च क्र काळाचें हें । कोणाचेनी दूर नोहे ।
तीचा श्वशुर शोकीं स्नेहें । त्या बांधून घे शत्रु राज्य ॥२४॥
त्या इ न्द्र सेनसुता । पाताळीं न्हेति राजसुता ।
जीववुनी वासुकी वार्ता । पुसे, सर्व सांगे तया ॥२५॥
तया म ग सर्पनाथ । म्हणे तुझें कोण दैवत ।
येरू म्हणे गौरीनाथ । मद्दैवत जगदीश ॥२६॥
तो त्या सि राहे म्हणे । चंद्रांगद पाठवा म्हणे ।
मद्विरहें माता शिणे । पत्नीं जिणें वेंचीलची ॥२७॥
तो ह य सर्पा सवें धाडी । वेगें आला यमुनाथडी ।
तेथ सीमंतिनी खडी । पाहतां वेडी हो तयासी ॥२८॥
हो स च्चा कीं हा मत्पति । ऐसें जंव चिंती चित्तीं ।
तों येवून तो पुढती । वार्ता तिची पुसे तो ॥२९॥
संल ग्नौ दासिन्यदीना । कोण ही ऐसें पुसतां खुणा ।
लाजुनी म्हणे सखीजनां । सर्व खुणा वदा ॥३०॥
सखी त या सर्व सांगे । तो वदे ईचा पति वेगें ।
भेटेल हें न वाउगें । आण घे शंकराची ॥३१॥
स्वस त्ते नें सोडवी ताता । मायबापांची हरी चिंतां ।
सीमंतीनीसी भेटता । झाला व्रताच्या प्रभावें ॥३२॥
भला जो डा तो शोभला । येउनी राज्यीं आरूढला ।
असें व्रतें दे शिव भोला । फल तिला गुरु म्हणे ॥३३॥
हें सा वि त्री व्रत तूं करीं । तथा म्हणुनी ती स्वीकारी ।
निरोपें ये स्वमंदिरीं । धवासह नारी भेटे स्वकां ॥३४॥
सुबु द्धि हो त्या दोघांची । जसी वाचा श्रीगुरूची ।
फलप्राप्ती तसी हो साची । तैं दु:खाची कैंची वार्ता ॥३५॥
इतिश्री० प० प० वा० स० सारे सीमंतिन्याख्यानकथनं नाम पंचत्रिंशो० ॥३५॥ग्रं० सं०॥४३७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP