मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
सप्तत्रिंशोsध्याय:

सप्तत्रिंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


गृह  भू  मी संमार्जन । कीजे नित्य लेपरंजन ।
शालग्रामशिला धेनू । गृहीं राखून ठेवा गव्य ॥१॥
गृहि  त्वा  दे गृहमेधीय । अग्निहोत्र किंवा गृह्य ।
हो संध्यावत् देवपूज्य । पशुतुल्यत्व अन्यथा ॥२॥
किंवा  प्रा  तर्विस्तारानें । दुपारीं पंचोपचारानें ।
सायंकाळीं निरांजनें । आठ स्थानें पूजनाचीं ॥३॥
जे को  णि  न पूजती । ते यमदंड घेती ।
वेदमंत्रें द्विज पूजिती । पौराणोक्तीं स्त्रीशूद्रादि ॥४॥
विपि  नां  तोत्थ्य मध्यम । क्रीत हीन, स्वीय उत्तम ।
तसीं श्वेत रक्त श्याम । पुष्पें अधम शूद्रानीत ॥५॥
न द्या  दे  वा सकृमिछिद्र । दुर्गे दूर्वा, केवडा हरा ।
वर्जा तुळसी गणेश्वरा । धुत्तुरार्कादि कृष्णा ॥६॥
वाम  ह स्ताकडे कलश । पुष्पादिकां दक्षिण देश ।
शंख घंटा वामदक्षिणेस । कीजे न्यास देहीं देवीं ॥७॥
कायें  मा  नसें वाचें द्विजां । षोडशोपचारें पूजा ।
मिळतां पंचामृतें पूजा । स्नानापूर्वीं नंतर भूषा ॥८॥
तवा  श्रि  त मी मला तारीं । म्हणुनी निर्माल्य धे शिरीं ।
भावें मंत्रजप करीं । तीर्थ पी शिरीं घे उद्वासीं ॥९॥
घे अं  त:  करणीं देवा । पंचसूना दोष जावा ।
जरी तरी वैश्वदेवा । प्रात:सायं स्वान्नशुध्यर्थ ॥१०॥
याचें  प्रा  त:कालारंभण । होम करी तो देवयज्ञ ।
हो बळी तो भूतयज्ञ। पितृनृयज्ञ तत्तर्पणें ॥११॥
वीक्ष  णा  र्थ अतिथीसी । किंचित् ठरा अंगणदेशीं ।
येतां अन्न द्या शक्तीसी । द्या यतीसी सजलान्न ॥१२॥
ओले  पा  द मुख कर । देवा घेउनी परिवार ।
नेणत्यासी वाढा दूर । नच करा पंक्तिभेद ॥१३॥
घालू  न  चित्राहुति । आपोशन घ्या मौन स्थिति ।
घ्याव्या मंत्रें प्राणाहुति । पात्र हातीं धरूनिया ॥१४॥
सर्वां  स  प्राणाहुत्यंत । मौन पुढें विकल्पित ।
पात्रीं टांका न उच्छिष्ट । जल पितां शब्द वर्ज्य ॥१५॥
दीप  मा  वळतां न खावें । रजस्वलांत्यां न देखावें ।
त्यांचे शब्द न ऐकावें । न शिवावे परस्पर ॥१६॥
दुर्वा  यु  अधो आतां । अन्न त्यजा कीटयुक्ता ।
न जेवावें वांती होतां । केश पडतां प्रोक्षुनि घ्यावें ॥१७॥
वियु  क्त:  स्यादू द्विजत्वात्स । पलांडुलशुनादिभुक् ।
तामसाहारभुग्दुर्धी: । सात्विकाहारभुक्सुधी: ॥१८॥
आज्या  प  योन्न लवण । सर्व खावें अन्य अन्न ।
सशेष द्यावें उच्छिष्टान्न । आपोशन अर्धें प्यावें ॥१९॥
मुखा  चा  शोधनासी । वर्जावें तर्जनीसी ।
मुख हस्तांघ्री शुचीसी । द्विराचमनें बोलियेलें ॥२०॥
व्या स  म्य  क् तांबुलादि । ऐकावें पुराणादि ।
कीजे सायंसंधाविधि । भोजनादि पूर्ववत् ॥२१॥
क्षीरा  न्न  रात्रीं शस्त । दिवाकर्म प्राक्प्रहरांत ।
रात्रौ वर्जा सौरपाठ । निशीथांत रात्रिकर्म ॥२२॥
जैं प  ञ्च  यज्ञादिक चुके । कीजे प्रायश्चित्त विवेकें ।
सुखशायिनिशां वंदा, सुखें । निजा ईशा अर्पून कर्म ॥२३॥
स्त्रीऋ  तु  कालीं करा रति । पर्व मूल मघा रेवती ।
वर्जा दिवा श्राद्धव्रती । ऋतुगामी ब्रह्मचारी ॥२४॥
न गु  र्वि  णीशीं रमावें । रतीं कोप द्वेष त्यजावे ।
ऋतू चुकवूनी न जावें । जातां पावे भ्रूणहत्या ॥२५॥
गह्र  धं  दा होतांहिं विप्रा । न सोडावें निजाचारा ।
गुरू ऐसें कथिते विप्रा । तो आचार करूनि तरे ॥२६॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे आन्हिककर्मनिरूपणं नाम सप्तत्रिंशो ॥३७॥ग्रं० सं०॥५०४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP