सप्तचत्वारिंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
भक्त अ तिप्रिय सात । दिवाळीच्या सणानिमित्त ।
न्याया गुरूसी गृहाप्रत । प्रार्थिती सप्तग्रामवासी ॥१॥
गुरु तो षवाया तयां । सातरूपें धरूनियां ।
जाती सातांच्या आलया । राहूनियां तया ग्रामीं ॥२॥
तों वि स्मि त होउनी पुढती । एकामेकां झगडती ।
माझे घरी गुरुमूर्ति । करिती दिपावळी असे ॥३॥
ग्राम लो क मिथ्या म्हणती । येथेंची होते गुरुमूर्ती ।
दिल्ही खूण सर्व दाविती । गुरु म्हणती सर्व सत्य ॥४॥
होसी के वळ परब्रह्म । असें स्तविती ते सप्रेम ।
तया भक्तां गुरूत्तम । देती धाम अलभ्य जें ॥५॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे दीपवल्युत्सववर्णनं नाम सप्तचत्वारिंशो० ॥४७॥ग्रं० सं०॥६३३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP