एकचत्वारिंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
निर हं कार त्वत्पूर्वज । सायंदेव कथिला तूज ।
गाणगापुरीं वसे निज । गुरुराज साक्षाद्देव ॥१॥
ही त द्वा र्ता परिसून । ये घालित लोटांगण ।
देवा पहातां हो तल्लीन । करी स्तवन प्रेमरसें ॥२॥
गुरु वि चारिती क्षेम । येरू सांगे धरुनी प्रेम ।
भवत्सेवाकाम । धरुनी, धाम सोडियेलें ॥३॥
घ्यावी मौ ज भक्तिरसाची । असी इच्छा हे मनाची ।
गुरु म्हणे सेवा आमुची । कठिण साची नेणसी तूं ॥४॥
कधीं पु रामध्यें वास । ग्रामीं वनीं नदीतीरास ।
तुला होती कष्ट सायास । कां तूं त्रास पतकरसी ॥५॥
तो क रु नी अंगिकार । राहे गुरूच्या बरोबर ।
त्याला एकला बाहेर । संगमावर न्हेति गुरू ॥६॥
जो दो षौ घा स्मरणें हरी । तो संकटीं त्यजि कीं हरी ।
हार्दें शिष्यपरिक्षा करी । आज्ञा करी मेघा वर्षूं ॥७॥
तेव्हां लो टुनी टांकी वारा । वर्षे मेघ मोठ्या धारा ।
द्विजें साहुनी वृष्टि वारा । रक्षिलें वस्त्राश्रयें देवा ॥८॥
गुरू के वल परीक्षार्थ । अग्नि आणावया धाडित ।
विद्युत्तेजें ये गांवांत । अग्नि भांड्यांत घेऊन ये ॥९॥
प्रत्य क्ष पथिं सर्पां देखे । पळतां, मठीं ध्वनी ऐके ।
प्रकाश देखे मनीं ठके । येउनि देखे एका देवा ॥१०॥
सर्प र क्षार्थ धाडिले । तुझें मन वायां भ्यालें ।
कठिण सेवा हें कळलें । साहस केलें त्वा गुरु म्हणे ॥११॥
हो प श्चा त्ताप कीं तुला । द्विज म्हणे देवा मला ।
जाणसी, मी काय तुला । सांगूं, मला न दवडी ॥१२॥
प्रत्य क्ष तूं ब्रह्मनिधान । गुरुसेवेचें विधान ।
सांगा तेणें स्थिर होईन । तें ऐकून गुरू सांगे ॥१३॥
कुमार र त्वष्ट्रदेवाचा । विद्यार्थी हो गुरूचा ।
भाव पहावया त्याचा । गुरू साचा वदे तया ॥१४॥
करीं ए क गृह निर्माण । जें न तुटे नोहे जीर्ण ।
करी वृष्ट्यादि निवारण । तें ऐकून तत्स्त्री बोले ॥१५॥
न शिं व ली न विणली । अंगाबरोबर भली ।
अशी रम्य दे मज चोळी । त्यावेळीं तत्सुत बोले ॥१६॥
माझ्या च रणा सुख देती । खात न लागे, मनोगती ।
दे पादुका जळीं न बुडती । गुरुकन्या तीही बोले ॥१७॥
हो अ क्ष यैकस्तंभघर । न हो पात्रीं पाक गार ।
काजळ न लागे त्यावर । दे सुंदर कुंडलें हीं ॥१८॥
कुमा र तो स्वीकारून । त्यां वंदून धरी रान ।
तेथें अवधूत येऊन । म्हणे कां म्लान मुख तुझें ॥१९॥
मन स्स माधान करून । बाळ सांगे सर्व नमून ।
येरु तया आश्वासून । काशीसेवन करी म्हणे ॥२०॥
जें श र्वा चें अधिष्ठान । गंगा राहे ज्या वेष्टून ।
सर्वदेवतीर्थस्थान । तत्सेवन करीं शीघ्र ॥२१॥
न को णि ही येथ अमुक्त । म्हणोनी हें हो अविमुक्ता ।
विरक्त किंवा विंषयसक्त । तेही मुक्त होती जेथ ॥२२॥
दुजें भू मंडळीं न असें । येरू वदे मी नेणतसें ।
काशीक्षेत्र मिळेल कसें । प्रार्थितसें मी तुम्हांस्सी ॥२३॥
म्हणे ता पसी मी दावीन । त्वद्योगें हो मज दर्शन ।
असें म्हणूनी त्या घेऊन । ये तत्क्षण मनोगती ॥२४॥
घेउ नि आला मनोगति । काशीयात्रा भावभक्तीं ।
करीं यथाविधी, निगुती । पूर्ण होती मनोरथ ॥२५॥
तो ऐ कू नि त्याचें वचन । म्हणे नेणें यात्राचरण ।
येरू म्हणे स्नान करून । मणिकर्णिकेचें येईं ॥२६॥
तूं भे ट विश्वेश्वरा । करी अंतर्गृहयात्रा ।
मग दक्षिणमानसयात्रा । स्नानार्चनश्राद्धदानें ॥२७॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे काशीयात्रानिरूपणं नाम एकचत्वारिंशो० ॥४१॥ग्रं० सं०॥५७४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP