पंचचत्वारिंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
ऐकें ई श्वरप्रभाव । नंदिनाम एक भूदेव ।
कुष्ठें व्यापुनी घे धांव। देवीपाशीं तुळजापुरीं ॥१॥
त्या ई श्व री जा गुरुपाशीं । म्हणे, तो बोले कां नरापाशीं ।
धाडिशी, मग भोपे यांसी । सांगून त्यासीं घालविलें ॥२॥
धी पु र: सर नावडतां । तो ये भेटे गुरुनाथा ।
गुरु म्हणे तूं कां आतां । आलास रे नरापाशीं ॥३॥
स्वकी य खूण ओळखून । तो प्रार्थी त्या देव मानून ।
गुरु म्हणे पापें करून । कुष्ठें व्यापून गेलासी ॥४॥
अक स्मात् पाप हो दूरी । या संगमीं स्नान तूं करीं ।
म्हणोनी त्याबरोबरी । सोमनाथासी धाडिती ॥५॥
तो त्या क्ष णीं स्नान करी । अश्वत्था प्रदक्षिणा करी ।
मठीं ये त्या अवसरीं । पाहें शरीरी गुरु म्हणे ॥६॥
शरी र त्याचें दिव्य झालें । किंचित् जंघेसी राहिलें
पुसे कुष्ठ हें कां राहिलें । गुरु बोले, विकल्पानें ॥७॥
त्वां जी म नुष्यधी धरिली । तीच तूज आड आली ।
माझी स्तुती करीं भली, । म्हणे तो लिखितही नेणें ॥८॥
विभू ती मग जिव्हेवर । टाकूनी, गुरु म्हणे स्तोत्र ।
करी, मग तो होयी धीर । करी स्तोत्र श्रीगुरूचें ॥९॥
आत्मा तो तूं सर्वाधीश । शुद्ध बुद्ध नित्य त्रीश ।
तुला नेणुनि कर्मपाशें । बद्ध होती जीव अज्ञानें ॥१०॥
ते अ ह ङ्कारें त्रिविध । पापें, घेती योनी विविध ।
समपापपुण्यें त्रिविध । नर होती रक्तरेतें ॥११॥
गभीं म हा कष्ट भोगी । सोडवाया प्रार्थी विरागी ।
उपजतां वेगीं । पुढें भोगी होउनि मरे ॥१२॥
त्वद्वी क्ष णा विना कैसा । प्रार्थी मानसा स्थिरवून ॥१३॥
गेलें रा हिलेलें कुष्ठ । जहाला तो गुरुप्रेष्ठ ।
कविता करी कविश्रेष्ठ । एकनिष्ठ गुरुपदीं ॥१४॥
इतिश्री० प० प० वा० स० वि सारे ब्राह्मणकुष्ठनिवारणं नाम पंचचत्वारिंशो० ॥४५॥ग्रं० सं०॥६२३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP