मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
चत्वारिंशोsध्याय:

चत्वारिंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


एक  वे  दज्ञ ब्राह्मण । श्वेतकुष्टें व्यापून ।
गुरूप्रति येऊन । म्हणे दीननाथा तारीं ॥१॥
झालों  दै  वें कुष्टी म्हणून । तोंड हें न पाहती जन ।
ह्याचें करीं तूं शमन । नातरीं प्राण सोडीन मी ॥२॥
पुर  श्च  र्यादिकें पाप । न जातां हो उलट ताप ।
देवा तूंची मायबाप । माझें पाप शमवीं हें ॥३॥
आश्वा  स  न देती गुरू । तंव आला एक नर ।
शुष्ककाष्ठ डोईवर । घेवोनी ठरला तो तेथें ॥४॥
अपू  र्वै  क चमत्कार । करूं इच्ची गुरुवर ।
सांगे विप्रा घे झडकर । संगमावर रोवीं काष्ठा ॥५॥
अवि  र  त सेवीं यासी । पाला येतां शुची होसी ।
द्विज रोवी त्या काष्टासी । सद्भावें जल शिंपी ॥६॥
लोक  ह  सुनी वारिती । नायके तो गुरूप्रती ।
ते येवोनी तें सांगती । गुरु म्हणती भाव फले ॥७॥
अप्र  मे  य भावफल । धनंजयवाक्यें सुशील ।
लिंगा चिताभस्म दे भिल्ल । एकदां लब्ध न हो भस्म ॥८॥
इच्छी  व  पू जाळावया । मला जाळीं म्हणे भार्या ।
भस्म दे, तिला जाळूनियां । प्रसाद घ्याया आली तीच ॥९॥
तये  वे  ळीं प्रगटे हर । तयां देई इष्ट वर ।
असा भावाचा प्रकार । म्हणूनी गुरू जाती तेथें ॥१०॥
त्या उ  द्यो  गातें पाहून । करिती काष्ठा प्रोक्षण ।
आले अंकूर फुटोन । विप्र स्वर्णवर्ण झाला ॥११॥
बर  वे  अंकुर फुटले । कुष्ठ सर्व मावळलें ।
द्विजें स्तवना आरंभिलें । तैं उदेले अष्टभाव ॥१२॥
शांत  दां  त इंदुकोटिकांतदीप्त अत्रिनंदना ।
देववृंदवंद्यपाद दत्त भक्तचित्तरंजना ॥१३॥
पाप  त  प्ततापभंजना सनातना जनार्दना ।
मायिकांधकारसूर्य दत्त भक्तचित्तरंजना ॥१४॥
दत्त  कृ  त्तकामरोष वेषधारि भिक्षु तूं जना ।
इष्टदेसि धर्म पासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१५॥
राग  द्वे  ष दोष वारिं, तारिं सूर्यचंद्रलोचना ।
भक्तकामधेनु तूंची दत्त भक्तचित्तरंजना ॥१६॥
हस्तिं  द  ण्ड कुंडि घेसि देसि जीव वीतजीवना ।
रक्तपद्मपत्रनेत्र दत्त भक्तचित्तंरंजना ॥१७॥
तूंचि  वि  श्वहेतु मंतुसोसि होसि मायबापना ।
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्तचित्तरंजना ॥१८॥
तूंचि  दे  व योगि होसि नासिं दैन्यदु:खकानना ।
न्यासि होसि कृष्णावासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१९॥
ब्रह्म  व  स्तु तूं अनादिमध्यनाश खास वासना ।
वारिं, भक्ति देयिं तारिं दत्त भक्तचित्तरंजना ॥२०॥
तया  चा  भाव जाणुनि विप्रा । विद्यासरस्वतीमंत्रा ।
देऊनियां सकलत्रा । राहवि मित्रापरी गुरू ॥२१॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे विप्रकुष्ठहरणं नाम चत्वारिंशो० ॥४०॥ग्रं० सं०॥५४७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP