मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि हे ग्रह ज्या दिशेस द्दष्टिगोचर होतात (उदय पावतात) व ज्या दिशेस सूर्याप्रत प्रवेश करितात (अस्त होते) त्या दिशेकडील लोकांस युद्ध, दुर्भिक्ष, उपद्रव यांनीकरून भय होते ॥१॥
चक्र, धनुष्य, शृंगाटक (त्रिकोण,) दंड, नगर, प्रास (भाला,) वज्र (दोनफाटयांचा,) या आकृतींचे ग्रह असले तर ते लोकांमध्ये दुर्भिक्ष, अवर्षण, करतील व राजांचे युद्धही होईल ॥२॥
सूर्य अस्तास जाण्याचेवेळी ज्या आकाशभागी ग्रहांची माळा दिसेल, त्या आकाशभागाच्या खालच्या प्रदेशात दुसरा राजा होईल व शत्रुचक्रापासून मोठा उपद्रवही होईल ॥३॥
ज्या नक्षत्री ग्रहांचा समागम म्ह. होईल, त्या नक्षत्राचे जन म्ह. लोक (नक्षत्रव्यूहोक्त) यांचा नाश होईल. तेच ग्रह परस्पर अविभेदन (छाद्यछादकत्व) भावे करून राहिले व स्वच्छकिरण असतील तर त्या नक्षत्राचे लोकांचे कल्याण होईल ॥४॥
ग्रहसंवर्त, ग्रहसमागम, ग्रहसंमोह, ग्रहसमाज, ग्रहसंनिपात, ग्रहकोश या प्रकारे सहा योग होतात, त्यांचे लक्षण व फल सांगतो. ॥५॥
एकनक्षत्री चार किंवा पाच यांचा ग्रह ग्रह पौरग्रहांशी संगत असतील तर. तो संवर्तनामक योग होतो. तेथेच केतु किंवा राहु असेल तर तो संमोहनामक योग होतो. पौरग्रहाचा (अ. १७ श्लो. ६।७) पौरग्रहाशी अथवा यायी ग्रहाचा यायीग्रहाशी योग झाला तर, तो समाजाख्य योग होतो. शनि व गुरु यांचा योग झाला असता, तेथे अन्यग्रह येईल तर, तो कोशसंज्ञक योग होतो ॥७॥
एक ग्रह पश्चिमेकडे उदय (सूर्यमंडलापासून निघणे) पावेल. व दुसरा ग्रह पूर्वेस उदय पावेल व ते दोघेही ग्रह एकनक्षत्री होतील तेव्हा तो संनिपाताख्या योग होतो. या समागमामध्ये ग्रहांचे तारे विकार न पावलेले, निर्मल, विस्त विस्तीर्णासे असतील तर ते धन्य (शुभ) होत ॥८॥
सवर्त व समागम या नावांचे ग्रहयोग सम (मध्यम) फल देणारे होत. संमोह व कोश या नावांचे ग्रहयोग लोकांस भय देणारे होत. समाजसंज्ञक ग्रहयोग शुभ होय. संनिपातसंज्ञक ग्रहयोग झाला असता, लोकांचे परस्पर वैर होते ॥९॥
॥ इतिबृहत्संहितायांग्रहशृंगाटकंनामविंशतितमोध्याय: ॥२०॥