देवांनी, चमरी (मृगवि०) प्राणी केशांकारणे हिमचलाच्या गुहांमध्ये उत्पन्न केले. त्यांच्या पुच्छापासून झालेले केश थोडे पिवळे, काळे, पांढरे असे होतात ॥१॥
स्निग्धत्व, मृदुत्व, बहुकेशत्व, स्वच्छता, शेपुट बारीक शुक्लत्व, ही त्या चमरीची गुणसंपत्ति सांगितली. ती खंडित, आखूड तुटलेली असता शुभ नव्हे ॥२॥
दंडार्ध म्हा० तीन हात विस्तृत, आसमंतात आवृत, रत्नांनी शोभित, उंच, असे छत्र राजास कल्याण व विजय देते ॥३॥
युवराज, राजस्त्री, सेनापति, दंडनायक (न्यायाधीश,) यांच्या छत्राचा दांडा साडेचार हात लांब व छत्राची रुंदी अडीच हात असावी ॥४॥
युवराजादिकांवाचून इतरांचे छत्र उष्णनाशक, शुभवस्त्रांनी सुशोभितशिर, रत्नमालायुक्त, असे मयूरपक्षांचे करावे ॥५॥
अन्यमनुष्यांचे, शीत व उष्ण यांचे निवारण करणारे असे चतुरस्र छत्र करावे. ब्राम्हाणांचे छत्र आसमंतात वर्तुळ व दंडयुक्त असे करावे ॥६॥
॥ इतिबृहत्संहितायांछत्रलक्षणंनामत्रिसप्ततितमोध्याय: ॥७३॥