कुत्र्यांसारखेच कोल्हयांचेही शब्दांचे फल जाणावे; परंतु त्यांस शिशिर (माघ व फाल्गुन व कुंभ आणि मीन) ऋतूमध्ये उन्माद (मस्ती) येतो, यास्तव त्यांत शब्दांचे फल नाही. कोल्हे शब्दांती, हू हू, असा शब्द करून पुढे, टा टा, असा शब्द करतील तर तो शुभ होय. याहून अन्यशब्द अशुभ होत ॥१॥
लोमाशिकेचा (खोकड, हे जनावर कोल्हयासारखे असते) कक्व हा शब्द, स्वाभाविक आहे. यास्तव पूर्ण (शुभ) होय. ए इतर सर्व शब्दते स्वाभाविक नव्हत, यास्तव दीप्त (अशुभ) होत. (पहा अ० ८६ श्लो० ३४) ॥२॥
शिवा (भालू) पूर्व व उत्तर, या दिशांकडे, शुभ होय. तिचा शांतशब्द असता सर्व दिशांकडे शुभ होय. धूमितदिशेकडे मुख व प्रखर स्वर अशी असेल तर त्या दिशेकडील राजाचा नाश करते ॥३॥
भालू दीप्त अ० सर्व दिशांस अशुभ होय. दिवसास तर फारच अशुभ होय. दक्षिणभागी राहणारी व सूर्यसन्मुख शब्द करणारी अशी शिवा नगरास व सैन्यास अशुभ होय. दक्षिणभागी राहणारी व सूर्यसन्मुख शब्द करणारी अशी शिवा नगरास व सैन्यास अशुभ होय ॥४॥
भालू, याहि, असा शब्द करील तर अग्निभय, टाटा, शब्द० तर बंधु इत्यादिकांचा मृत्यु सांगते; धिकधिक शाब्द क० तर अशुभ सांगते. ज्वालायुक्त भालू देशाचा नाश करते. (भालूच्या तोंडातून ज्वाळा निघत असतील असे वाटते) ॥५॥
कश्यपादि ऋषि, सज्वाला शिवा अशुभ नाही असे म्हणतात. जसा सूर्यादि तेजस्वी पदार्थ स्वभावानेच तेजस्वी, तसे भालूचे मुख स्वभावानेच लालयुक्त आहे. यास्तव ती शुभ होय ॥६॥
भालू, दक्षिणदिशेकडे राहून दुसरीस प्रतिशब्द करील तर गळफासाने मृत्यु सांगते. ती भालू पश्चिमेकडे राहून प्रतिशब्द करील तर उदकामध्ये बंध्वादि मृत झाला असे सांगते ॥७॥
भालूच्या प्रथमशब्दी, निर्भय, २ इष्टाचे श्रवण, ३ धनप्राप्ति, ४ प्रियागमन, ५ क्षोभ, ६ प्रधानमंडळीत कलह, ७ अश्वादिवाहनवृद्धि, ॥८॥
सप्तमशब्दापर्यंत ही फले घ्यावी; पुढे अष्टमापासून शब्दफल घेऊ नये. भालू दक्षिणदिशेकडे राहून शब्द करील तर तेच फल विरुद्ध जाणावे. (१ भय २ अनिष्ट श्रवण ३ धनहानि ४ प्रियवियोग ५ निर्भय ६ प्रधानसख्य ७ वाहननास) ॥९॥
ज्या भालूच्या शब्दाने मनुष्यांचे रोमांच उभे राहतात व घोडे विष्ठा, मूत्र सोडतात. तसाच, शब्दाने त्रास होतो, ती भालू अशुभ होय ॥१०॥
जी भालू, मनुष्य, हत्ती, जश्व यांचा प्रतिशब्द झाला असता, मौन धरते ती सैन्यात व नगरात कल्याण करते ॥११॥
भालू, भेभे असा शब्द करील तर भयकारक; भोभो असा शब्द विपत्तिकारक; फिफ, असा शब्द० मृत्यु व बंध सांगते; हूहू, असा शब्द करील तर कल्याणकारक, हे सर्व फळ गमनकर्त्यास समजावे ॥१२॥
जी भालू, शांतदिशेस राहून, शांत होत्साती प्रथम अ, असा शब्द करून पुढे, औ, असा श० अथवा, टाटा, असा शब्द करील किंवा प्रथम टेटे, असा श० क० पुढे, थेथे असा शब्द करील तर, तो शब्द तिने संतोषाने केलेला, यास्तव त्याचे फल नाही ॥१३॥
जी भालू, प्रथम भयंकर शब्द करून, नंतर कोल्हयासारखी शब्द करते. ती कल्याण व द्रव्यप्राप्ति व प्रवासास गेलेल्या प्रियाचा संयोग यांते सांगते ॥१४॥
॥ इतिसर्वशाकुनेशिवारुतंनामपंचमोध्याय: ॥५॥
॥ इतिबृहत्संहितायांनवतितमोध्याय: ॥९०॥