बृहत्संहिता - अध्याय २९
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
वृक्षांची फले व पुष्पे यांच्या उत्तम वृद्धीवरून पदार्थांचे सुलभत्व व धान्यांची उत्पत्ति ही जाणावी ॥१॥
शाल (साया किंवा अर्जुनवृक्ष) वृक्षाच्या फलपुष्पवृद्धीने कलमशाली (पांढर्या भाताची जात) चांगली होते. तांबडया अशोकवृक्षाने तांबडीसाळ किंवा महाडीचे भात ही चांगली होता. क्षीरिका (दुधाळवृक्ष) इने पांडूक (शालिवि.) होतात. नील अशोकाने सूकरक (शालिवि.) होतात ॥२॥
वटवृक्षाने यवक (शालि वि.) होते. तिंदुक (टेंभुरणी) वृक्षाच्या वृद्धीने षष्टिक (साठ दिवसांनी पिकणारे, अवचिते भात) होते. पिंपळाने सर्व धान्यांची उत्पत्ति चांगली होते ॥३॥
जांभळीनी तील व उडीद हे होतात. शिरीष (शिरसाचे झाड) वृक्षाने कांग होता. मोहाच्या झाडाने गहू होतात. सात्विणाने यव (सातु) होतात ॥४॥
अतिमुक्त (तिवस, तिवर) व कुंद यांच्या फलपुष्पवृद्धीने कापूस होतो. अशन (असणी, चित्रक) वृक्षाने सर्षप होतात. बोरीच्या झाडांनी कुळीथ होतात. करंजाने मूग होतात ॥५॥
वेतस (वेत) पुष्पांनी जवस होतात. पळसाच्या पुष्पांनी कोद्रव (हरीक) होतात. तिळाने शंख, मौक्तिक, रुपे ही होतात. हिंगणबेटयाने शण (ताग) होतो ॥६॥
हस्तिकर्ण (एरंड किंवा पळस) वृक्षाने हत्ती होतात. अश्वकर्ण, (साग, राळेचा वृक्ष) या वृक्षाने अश्व होतात. पाटला (तांबडा लोध्रवृक्ष) याने गाई होतात. केळींनी शेळ्या, मेंढया होतात ॥७॥
चंपकपुष्पांनी सुवर्ण होते. बंधुजीव (दुपारी) पुष्पाने पोंवली होतात. कोरांटयांनी हिरे होतात. नंदिकावर्त (नांदरुखी) वृक्षाने वैडूर्यमणि होतात ॥८॥
निर्गुडीने मौक्तिके होतात. कुसुंभ (कर्डई) वृक्षाने कुंकुम होते. तांबडया कमलाने राजा चांगला होतो. नीलकमलाने प्रधान होतो ॥९॥
सुवर्णपुष्पांनी श्रेष्ठी (कुलपरंपरागतशिल्पज्ञ) यांची वृद्धि होते. कमलांनी ब्राम्हाण होतात. चंद्रविकासी कुमुदांनी पुरोहित (राजोपाध्याय) होतात. सौगंधिकाने (श्वेतरक्त कमलाने) सेनापति होतो. रुईने धनवृद्धि होते ॥१०॥
आम्रवृक्षांनी कल्याण होते. भिलाव्यांनी भय होते. पीलु (अक्रोडाचे झाड) वृक्षांनी आरोग्य होते. खैर व शमी यांनीकरून दुर्भिक्ष होते. अर्जुनवृक्षांनी चांगली वृष्टि होते ॥११॥
कडुनिंब व नागकेशरपुष्प यांनी सुभिक्ष होते. कवठीच्या वृक्षाने वायु होतो. निचुलाने (वेताने) अवर्षणभय होते. कुडयाने व्याधिभय होते ॥१२॥
दूर्वा, कुश यांच्या पुष्पांनी ऊस होतात. कोविदार (बाहवा) या वृक्षाने अग्निवृद्धि होते. श्यामालता इने वेश्यांची वृद्धि होते ॥१३॥
ज्या देशी वृक्ष, गुल्म (झुडपे,) वल्ली हया निर्मल व छिद्ररहितपाने अशा असतील त्यादेशी त्यावर्षीं चांगली वृष्टि होईल. ती जर रूक्ष व छिद्रयुक्तपानांची असतील तर अल्पवृष्टि होईल ॥१४॥
॥ इतिबृहत्संहितायांकुसुमलताध्यायएकोनत्रिंश: ॥२९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2015
TOP