मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १०६

बृहत्संहिता - अध्याय १०६

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


प्रथम शास्त्रोपनय, सांवत्सरसूत्र, अर्कचार, चंद्रचार, राहूचार, भौमचार, बुधचार, गुरुचार, शुक्रचार, शनिवार, केतुचार ॥१॥

अगस्त्यचार, सप्तर्षिचार, कूर्मविभाग, नक्षत्रव्यूह, ग्रहभक्ति, ग्रहयुद्ध ॥२॥

शशिग्रहसमागम, ग्रहवर्षफल ग्रहशृंगाटक, मेघांचे गर्भधारण ॥३॥

धारणा, प्रवर्षण, रोहिणीयोग, स्वातियोग, आषाढीयोग, भाद्रपदयोग, सद्योवृष्टि, कुसुमलता, संध्यालक्षण, दिग्दाह ॥४॥

भूमिकंप, उल्कालक्षण, परिवेषल० इंद्रायुध, गंधर्वनगर, प्रतिसूर्य, निर्घातल० सस्यजात, द्रव्यनिश्चय, अर्धकांड ॥५॥

इंद्रध्वज, नीराजन, खंजनक, उत्पातल०, मयूरचित्रक, पुष्यस्नान, पट्टप्रमाण, खडगल०, वास्तुविद्या ॥६॥

उदगार्गल,आरामिक (वृक्शायुर्वेद,) प्रासादल०, वज्रलेप, प्रतिमाल०, वनप्रवेश, देवालयप्रतिष्ठा ॥७॥

गोलक्षण, श्वल०, कुक्कुटल०, कूर्मल०, छागल०, पुरुषल०, पंचमहापुरषल०, स्त्रील०, वस्त्रच्छेदलक्षण ॥८॥

चामरल०, दंडपरीक्षा (छत्रल०,) स्त्रीप्रशंसा, सौभाग्यकरण, कांदर्पिक, गंधयुक्ति, पूंस्त्रीसमायोग, शय्यासनल०, ॥९॥

वज्रपरीक्षा, मौक्तिकप० पद्मरागप०, मरकतप०, दीपल०, दंतकाष्ठल०, शाकुन, मिश्र (मिश्रकाध्याय,) ॥१०॥

अंतरचक्र, शकुनरुत, श्वचक्र, शिवारुत, मृगचेष्टित, अश्वचे०, हस्तीगित, वायसरुत, शाकुनोत्तराध्याय ॥११॥

पाक, नक्षत्रगुण, तिथिकरणगुण, सधिष्ण्यजन्मगुण (नक्षत्रजातक,) ग्रहगोचर, नक्षत्रपुरुषव्रत ॥१२॥

हे १०० अध्याय पाठक्रमाने केले. यता किंचित कमी, ४ हजार (श्लोकच्छंदाने) श्लोक बांधिले आहेत ॥१३॥

२७ वातचक्र ३८ रजोलक्षण ५१ अंगविद्या ५२ पिटकलक्षण, हे चार अध्याय वराहमिहिरकृत नाहीत. व्यवहारात त्या विषयांचा उपयोग आहे, म्हणून टीकाकारांनी लिहिले आहेत.

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी मी उत्पलनामकाने ही टीका केली. ॥१॥

वराहमिहिराचार्याने केलेला जो संहितासमुद्र यामध्ये अर्थग्राहकांस अर्थप्राप्ति व्हावी या हेतूने हा टीकारूप प्लव (नौका) उत्पलनामक पंडित करिता झाला. २ हा वराहमिहिराचार्याने केलेला, किंचित न्यून, चार हजार (श्लोकच्छंदाने) ग्रंथ; यावर उत्पलनामक पंडिताने ८८८ शकात केलेल्या संस्कृत टीकेवरून ही प्राकृत टीका शके १७९६ आश्विनशुद्ध १ रविवार ता० ११ आकटोबर १८७४ रोजी समाप्त केली आहे. यात न्यूनातिरिक्त असेल ते पंडितांनी मत्सरभाव टाकून पूर्ण करावे ही प्रार्थना आहे ॥


ग्रंथ समाप्ती

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP