मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १७

बृहत्संहिता - अध्याय १७

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


त्रिकालज्ञ (भूत, भविष्य, वर्तमान जाणणारे) ऋषि, ज्याकालीं ज्याप्रकराने होणारे ताराग्रहांचे युद्ध सांगता, त्याचे ज्ञान (साधन) करणे (गणितस्कंधी) सूर्यसिद्धांतानुसारे मी सांगितले. ॥१॥

आकाशात फिरणारे, एकावर दुसरा अशाप्रकारे आपल्या मार्गांत रहाणारे व अति दुरून द्दष्टिगोचर समत्वाते (बरोबरीते) प्राप्त झालेले जे भौमदि ग्रह, त्यांचे फार निकट क्रमयोगाने नेद, उल्लेख, अंशुमर्दन, असव्य, या चार प्रकारचे युद्ध परासरादि ऋषींनी सांगितले. १ किरणों किरणाचे मर्दन म्हणजे जेथे दोन्ही ग्रह एकच दिसतात ते भेददयुद्ध, २ एकाग्रहाने दुसर्‍या ग्रहाच्या बिंबाचा स्पर्श करिजेतो ते उल्लेखयुद्ध. ३ अतिनिकट ग्रहांचे किरण परस्पर हन्यमान (ताडित) दिसतात ते अंशुमर्दनयुद्ध. ४ बरोबर होऊन डाव्या अंगाने जाण ते अपसव्ययुद्ध ॥२॥३॥

भेदसंज्ञक युद्ध झाले तर अवर्षण, मित्रांचा परस्पर व महाकुलीनांचा परस्पर भेद होतो. उल्लेख संज्ञक युद्ध झाले तर शस्त्रभय, प्रधानांचा विरोध, दुर्भिक्षही होतात. अशुविरोधसं. (अंशुमर्दनसं.) युद्ध झाले तर राजांची युद्धे, शत्र, रोग, क्षुधा, यांपासून अतिपीडा ही होतात. अपसव्ययुद्धी राजांची युद्धे होतात ॥४॥५॥

सूर्य खमध्यभागी असता आक्रंदसंज्ञक, पूर्वेकडे अ. पौरसं., पश्चिमेकडे अ. यायीसं. होतो. बुध, गुरु, शनि, हे नित्य पौरस. होत. चंद्र नित्य आक्रंदस. होय. केतु, भौम, राहु, शुक्र हे यायीस, होत. हे ग्रह आक्रंदादिसंज्ञक ग्रहांते भारतात त्या युद्धात ज्यांचा जय होतो ते आपल्या वर्गाचा जय करितात ॥६॥७॥

पौरग्रह, पौरग्रहाने हत असता, नगरसंबंधी लोक आपल्या राजाचा नाश करतील, असेच यायीग्रह आक्रंदग्राहान हत अ. येणार्‍या राजाचा नाश. नागर म्ह. पौरग्रह यायीग्रहाने हत अ. नगरच्या राजाचा नाश, याप्रकारे जाणावे ॥८॥

दक्षिणदिशेस रहाणारा, परुष (रखरखीत,) कंपित, दुसर्‍या ग्रहाजवळ न जाता मागे फिरला (वक्रगति झाला,) बारीक झालेला, अधिरूढ (दुसर्‍या ग्रहाने आक्रांत,) विकार पावलेला, तेजहीन झालेला, विवर्ण (वर्णरहित,) असा जो ग्रह तो जित (जिंकलेला) असे जाणावे ॥९॥

पूर्वश्लोकोक्त लक्षणांहून विपरीतलक्षणसंपन्न जो ग्रह त्याचा जय झाला असे समजावे. तसाच जो ग्रह विपुल (मोठे) बिंब, निर्मल, तेजस्वी तो ग्रह दक्षिणदिशेस असला तरी जयाने युक्त असे जाणावे. (असे बहुधा शुक्राचे होते) ॥१०॥

दोघेही ग्रह समागमामध्ये स्वच्छ किरणांनी युक्त, विस्तीर्णबिंब, निर्मल, असे असतील तेथे दोघांची प्रीति आहे असे समजावे. याहून विपरीत अ. आपल्या पक्षाचा नाश करणारे होतात ॥११॥

ग्रहाचे परस्पर युद्ध किंवा समागम पूर्वोक्त लक्षणांनी जर अस्पष्ट होतील तर भूमीवर राजांसही तसेच अस्पष्ट फल सांगावे ॥१२॥

गुरूने मंगळ जिंकला अ. बाल्हीक देशांतील लोक, मार्गस्थ, अग्निजीवी (सुवर्णकारादिक,) यांस पीडा होते. बुधाने मंगळ जिंकला अ. शूरसेन, कलिंग, साल्व या देशांत रहाणार्‍या लोकांस पीडा होते. बुधाने मंगळ जिंकला अ. शूरसेन, कलिंग, साल्व  या देशांत रहाणार्‍या लोकांस पीडा होते. शनैश्वराने मंगळ जिंकला अ. नागरिक लोकांचा जय व प्रजांस पीडा होते. शुक्राने मंगळ जिंकला अ. कोष्ठागार, म्लेच्छ, क्षत्रिय यांस ताप (दु:ख) होतें ॥१३॥१४॥

भौमाने बुध जिंकला असता वृक्ष, नद्या, तपस्वी, अश्मकजन, राजे, उत्तरदिशेस रहाणारे लोक, यज्ञ करणारे, या सर्वांस दु:ख होते ॥१५॥

गुरुने बुध जित अ. म्लेच्छ, शूद्र, चोर, धनवान, नगरवासी लोक, त्रिगर्ग देशांतील लोक, पर्वतवासीलोक या सर्वांस पीडा होते व भूमिकंपही होतो ॥१६॥

शनीने बुध ध्वस्त (पराजित) केला अ. नावाडी, योद्धे, जलजप्राणी, द्रव्यवान, सगर्भस्त्रिया यांस पीडा होते. शुक्राने बुध जित अ. अग्निकोप होतो. धान्ये, मेघ, पांथस्थ यांचा नाश होतो ॥१७॥

बृहस्पति शुक्राने जिंकिला असता. कुलूत, गांधार, कैकय, मद्र, साल्व, वत्स, वंग, हे देश; गाई, धान्ये यांचा नाश होतो ॥१८॥

भौमाने बृहस्पति जित अ. मध्यदेश म्ह. हिमालय व विंध्याद्रि (सातपुडा) यांचा मध्यभाग, राजे, गाई यांस पीडा होत्ये. शनीने बृहस्पति जित अ. अर्जुनायन लोक, वसाति, योद्धे, शिबिदेशस्थलोक, ब्राम्हाण, यांचा नाश होतो ॥१९॥

बुधाने बृहस्पति जित अ. म्लेच्छ, सत्यवादी, शस्त्रे धारण करणारे, मध्यदेश हे सर्व नाश पावतात व जे गुरूचे पूर्वोक्त भक्तिफल तेही नाश पावते ॥२०॥

बृहस्पतीने शुक्र जित अ. पांथस्थ. श्रेष्ठजन यांचा नाश होतो. ब्राम्हाण, क्षत्रिय यांस उपद्रव होतो व अवर्षणही होते ॥२१॥

कोशल, कलिंग, वंग,  वत्स, मत्स्य, मध्यदेश या देशांतील लोकांस महान पीडा होते नपुंसक, शूरसेनदेश स्थलोक यांसही पीडा होते ॥२२॥

भौमाने शुक्र जिंकला अ. सेनापतीचा वध व राजांची युद्धे होतात. बुधाने शुक्र जिंकला अ. पर्वतवासी लोकांचा व गाईंच्या दुधाचा नाश होतो व अल्पवृष्टि होते ॥२३॥

शनीने शुक्र जिंकला अ. गणश्रेष्ठ, शस्त्रवृत्ति, क्षत्रिय, जलोद्भव प्राणी, या सर्वांस पीडा  होते व जे पूर्वोक्त भक्तिफल ते विपरीत होते ॥२४॥

शुक्राने शनि जिंकला अ. अर्धवृद्धि (द्रव्यांची वृद्धि) होते. सर्प, पक्षी, अभिमानी लोक यांस पीडा होते. भौमने शनि जित अ. टंकण, आंध्र, उड्र. काशि, बाल्हीक या देशांस पीडा होते ॥२५॥

बुधाने शनि जित अ. अंगदेशस्थ लोक. व्यापारी. पक्षी, पशु ह्त्ती यांस पीडा होते. गुरूने शनि जिंकला. अ. स्त्रीबहुलदेश, महिष, कशक यांस पीडा होते ॥२६॥

युद्धामध्ये जिंकलेले जे भौम, बुध, गुरु, शुक्र, शनि यांचा हा पूर्वोक्तविशेष सांगितला. इतर जे फल ते पूर्वाध्यायोक्त ग्रहभक्तीवरून  सांगावे. ते असे की, ज्या एकाराने ग्रहांचा पराजय होईल तसा स्वभक्तीचा नाश होईल ॥२७॥


॥ इतिबृहत्संहितायांग्रहयुद्धंनामसप्तदशोध्याय: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 19, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP