बृहत्संहिता - अध्याय ७५
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
संपूर्ण कामजन्यसुख सुरूपपुरुषासच होते. इतरास क्षणभर भासते मात्र (स्त्री मनाच्या वियोगास्तव.) कारण स्त्रियांचे मन सुंदर पुरुषावर लुब्ध होते. दूर असूनही स्त्री ज्या पुरुषाते चित्तात आणील त्या पुरुषाच्या स्वरूपासारखे गर्भातील मुलाचे स्वरूप होईल ॥१॥
वृक्षाची फांदी भूमीवर लावली किंवा बी पेरले तर ते पूर्ववृक्षापेक्षा निराळ्या प्रकारचे होत नाही. असाच आत्मा स्त्रियांच्याठाई पुन: उत्पन्न होतो. कदाचित काही क्षेत्रयोगाने त्यामध्ये विशेष होतो ॥२॥
मनासहवर्तमान आत्मा जातो. इंद्रियांसह मन जाते, शब्दादि अर्थांसह इंद्रिये जातात, असा शीघ्रक्रम होतो. हाच मनाचा संबंध होय. यास्तव मनास अगम्य काय आहे. जेथे मन जाते. तेथे हा आत्मा जातोच ॥३॥
हा जीवात्मा ह्रदयामध्ये परमात्म्याचाठाई गेला असता, अतिसूक्ष्म असताही निरंतर योगास्तव निश्चलमनाने ग्राहय होतो. नंतर जो पुरुष ज्या वस्तूचे चिंतन करितो त्या वस्तुरूप तो आत्मा होतो. यास्तव स्त्रिया सुंदरपुरुषाप्रतच जातात ॥४॥
दाक्षिण्य (चित्त संतुष्ट करून अनुकूल करणे) हे एकच सुभगत्वाचे कारण होय. त्याहून विपरीत ज्या चेष्टा ते विद्वेषण होय. वशीकरणादि मंत्र व औषधविशेष व भोजनादि कपटप्रयोग यांनीकरून बहुत दोष होतात, कल्याण होत नाही ॥५॥
गर्व सोडणारा पुरुष सर्वजनांस प्रिय होतो. गर्वित पुरुष दुर्भगत्वाते प्राप्त होतो. अभिमानी पुरुष कष्टाने कार्ये साधितो. गोड बोलणारा यत्नावाचून कार्ये साधितो ॥६॥
जे प्रियवस्तूच्याठाई साहस करणे ते तेज नव्हे. जे वाक्य अनिष्ट (मर्मवेधक) व दुष्टभाषित ते वाक्य नव्हे. कार्याचा शेवट करून जे गर्वरहित, तेच तेजस्वी (सुभग) होत. जे निरर्थक दुष्टभाषण करितात ते सुभग नव्हत ॥७॥
जो सर्वजनप्रियत्वाते इच्छितो त्याने सर्वांचे परोक्ष किंवा अपरोक्ष गुणवर्णनच करावे (तेणेकरून तो लोकप्रिय होतो.) दुसर्याच्या दोषाते जो वर्णन करितो तो दुर्जनांपासून बहुत दोषांते प्राप्त होतो. (दुसर्याच्या स्तुतीने सज्जन व निंदेने दुर्जन होतो) ॥८॥
सर्वांवर उपकार करणारा जो पुरुष त्यावर सर्व लोक उपकार करतात. शत्रूंवरही विपत्तिकाली उपकार करून जी कीर्ती मिळते ती अल्पपुण्याने मिळा नाही ॥९॥
तृणांनी आच्छादित असताही अग्नि आपल्या गुणांनी अत्यंत वृद्धिते पावतो तद्वत दुसर्याच्या गुणांचा नाश करण्याविषयी इच्छिणारा दुर्जन अधिक हीनत्व पावतो ॥१०॥
॥ इतिबृहत्संहितायांअंत:पुरचिंतायांसौभाग्यकरणंनामपंचसप्ततितमोध्याय: ॥७५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2015
TOP