अश्विन्यादि नक्षत्रांच्या तारा - अश्विनीच्या ३ भरणी ३ कृत्तिका ६ रोहिणी ५ मृग ३ आर्द्रा १ पुनर्वसु ५ पुष्य ३ आश्लेषा ६ मघा ५ पूर्वा ८ उत्तरा २ हस्त ५ चित्रा १ स्वाती १ विशाखा ५ अनुराधा ७ ज्येष्ठा ३ मूळ ११ पृ० षा० ख उ० षाअ० ८ श्रवण ३ धनिष्ठा ५ शततारका १०० पू० भा० २ उ० भा० ८ रेवती ३२ तारा होत. प्रमाणाने कालही जाणावा. (तो प्रकार पुढे सांगतो) ॥१॥२॥
विवाहाच्याठाई नक्षत्रापासून होणारे शुभाशुभ फल तारांइतक्या वर्षांनी होते. अश्विन्यादि नक्षत्रांवर आलेल्या ज्वराचा नाशा पूर्वोक्त तारांचे संख्येचे दिवसांनी होतो. तसाच अन्यव्याधीचाही नाश होतो ॥३॥
१ अश्विनीकुमार (नासत्य) २ यम ३ अग्नि ४ ब्रम्हा ५ चंद्र ६ शिव ७ अदिति ८ जीव ९ सर्प १० पितर ११ योनि १२ अर्यमा १३ सूर्य १४ त्वष्टा १५ वायु १६ इंद्राग्नी १७ मित्र १८ इंद्र १९ निऋति २० उदक २१ विश्वे २२ ब्रम्हा २३ हरि २४ वसु २५ वरुन २६ अजपाद २७ अहिर्भुध्न्य २८ पूषा हे अश्विन्यादि नक्षत्रांचे स्वामी होत ॥४॥५॥
उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी ही ध्रुवसंज्ञक होत. या नक्षत्रांनी राज्याभिषेक, उत्पातादिकांची शांति, वृक्षारोपण, नगरप्रतिष्ठा, धर्मकिया, बीजवाप, स्थिरकार्यांचा आरंभ ही करावी ॥६॥
मूळ, आर्द्रा, ज्येष्ठा, आश्लेषा ही तीक्ष्णसंज्ञक होत. यांच्याठाई अभिघात, मंत्रप्रयोग, वेतालबंधन, वध, भेद, संबंध ही सिद्ध होतात ॥७॥
पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, भरणी, मघा, ही उग्रसंज्ञक होत. ही उत्सादन, नाश, शठभाव, बंधन, विषप्रयोग, अग्निकर्म, शस्त्रप्रयोग, घात, इत्यादिकर्मी योजावी ॥८॥
ह्स्त, अश्निनी, पुष्य, ही लघृसं० होत. (कोणी येथे अभिजित घेतात) यांच्याठाई क्रयविक्रय, सुरत, शास्त्रारंभ, अलंकार, गीतवाद्यादि, शिल्पकर्म, औषधप्रयोग, यात्राअ इत्यादिकर्मे सिद्धिकारक होतात ॥९॥
अनुराह्दा, चित्रा, रेवती, मृग ही मृदुसं० होत. ही मैत्रीकरण, सुरतविधि, वस्त्रधारण, भूषण, म्गलकार्य, गीत यांच्याठाई हितकारक होत ॥१०॥
कृत्तिका व विशाखा ही मृदुतीक्ष्ण (मिश्र) होत. यांच्याठाई मिश्रफल होते. श्रवण, धनिष्ठा, शततारका, हस्त, स्वाती ही चरकर्मांच्याठाई हित होत ॥११॥
हस्त, चित्रा, स्वाती, मृगशीर्ष, श्रवण, धनिष्ठा, शततारकाम, रेवती, अश्विनी, ज्येष्ठा, पुष्य, पुनर्वसु ही नक्षत्रे क्षौरकर्मी शुभ होत. नक्षत्र उक्त न सापडे तर दिवसाची लग्ने १२ त्यात २७ नक्षत्रे भोगतात. यास्तव त्याप्रमाणे मेषादिलग्नी उक्तनक्षत्र काढून ते घ्यावे अथवा या नक्षत्राम्च्या मुहूर्ती अथवा य नक्षत्री चंद्रबल किंवा ताराबल असता क्षौरकर्म करावे ॥१२॥
स्नान केलेला, यांत्रोत्सुक, अलंकारयुक्त, अभ्यंग केलेला, भोजन केलेला, युद्धोन्मुख, आसनरहित, संध्या, रात्रि, मंगळ, शनि, क्वचित रवि, या वारी; रिक्ताअ (४।९।१४) या तिथीस, नवव्या दिवसी, विष्ट (भद्रा) करणी क्षौर शुभ नव्हे ॥१३॥
राजाची आज्ञा, ब्राम्हाणांची आज्ञा, विवाहकाल, मृतसूतक, बंधमोक्ष, यज्ञदीक्षा, यांच्याठाई सर्व नक्षत्रे क्षौरास शुभ होत ॥१४॥
हस्त, मूळ, श्रवण, पुनर्वस, मृगशीर्ष, पुष्य ही नक्षत्रे पूंवनादिकर्मांच्याठाई शुभ होत ॥१५॥
हस्त, रेवती, स्वाती, अनुराधा, पुष्य, चित्रा, मृगशीर्ष या नक्षत्री; गुरु, शुक्र, बुध, चंद्र या वारी नामकरणादि संस्कार, यज्ञदीक्षा, व्रत, मेखलाबंधनादि कर्मे करावी ॥१६॥
११।३ या स्थानी शुभ्र ग्रह असता, पापग्रहांनी रहित शुभग्रहाच्या लग्नी पूर्वोक्त नामकरणादि कर्म करावे. गुरूच्यालग्नी पुष्य, मृग, चित्रा, श्रवण, रेवती या नक्षत्री कर्णवेध करावा ॥१७॥
द्वादश, केंद्र (१।४।७।१०) नैधन (८) ही स्थाने शुद्ध (पापग्रहरहित) असता, ३।६।११ या स्थानी पापग्रह असता, लग्नी किंवा केंद्री बृहस्पति किंवा शुक्र अ० सर्वारंभाच्या फलाची प्रसिद्धि होते. याचलग्नी कर्त्याची जन्मरशि व जन्मलग्न शुभग्रहयुक्त अ० सग्राम्य (अन्यग्रंथांत सांगितल्याप्रमाणे अनुकूलग्राम) स्थिरलग्नी गृहारंभ व गृहप्रवेश करावा ॥१८॥
॥ इतिवरा०बृह०नक्षत्रगुणानामाष्टानवतितमोध्याय: ॥९८॥