पिसे व अंगुलि सरळ ज्याच्या असा, मुख, नखे, चूलिक (मस्तकावरील शिखा) ही तांबडी, पांढरा, उष:काली सुस्वर शब्द करितो असा जो कोंबडा, तो राजा, राष्ट्र व घोडे यांची वृद्धि करितो ॥१॥
यवग्रीव (ज्याची मान मध्ये जाडी असा,) बदरसद्दश (लोहितवर्ण,) विस्तीर्ण मस्तक, बहुत वर्णांनी युक्त,निर्मल असा कोंबडा युद्धामध्ये शुभ होय. अथवा मधाच्या वर्णाचा किंवा भ्रमरासारखा (काळा) तोही जय करणारा होय. याहून अन्य, कृश, अल्पशब्द, आंखूड पायांचा कोंबडा शुभ नव्हे ॥२॥
मृदु व सुंदर शब्द करणारी, निर्मलशरीर, मुख व डोळे सुंदर आहेत जिचे अशी कोंबडी राजांस लक्ष्मी, कीर्ती, विजय, बल व संपत्ति यांते देते. यास्तव राजांनी अशी कोंबडी बाळगावी ॥३॥
॥ इतिबृहत्संहितायांकुक्वुटलक्षणंनामत्रिषष्टितमोध्याय: ॥६३॥