वस्त्राच्या चार कोनांवर देव राहतात. पाशांत व दशांत मध्य यांच्याठाई मनुष्य राहतात. मधल्या तीन भागी राक्षस रहातात. असेच शय्या, आसन, पादुका यांच्याठाईही देवादि राहतात ॥१॥
काजळ वगैरे, गोमय, चिखल इत्यादिकांनी लिप्त, कापले, दग्ध झाले, फाटले असता; त्या वस्त्राचे शुभाशुभफल जाणावे. नवे वस्त्र अ० पूर्णफल, मध्यम अ० अल्पफल, जीर्ण अ० फार थोडे फल होते. उत्तरीय (आंगवस्त्र) वस्त्र लिप्तादि अ० शुभाशुभफल अधिक होते ॥२॥
राक्षसभागी छेदादि झाली अ० वस्त्रस्वामीस रोग किंवा मृत्यु होतो. मनुष्यभागी पुरुषाची तेजवृद्धि होते. सर्वभागी शेवटास छेदादि झाली अ० अशुभफल होते ॥३॥
कंक (पक्षिवि०) प्लव (पाण्यावर तरणारा हंसादि पक्षि,) घुबड, कवडा, कावळा, मांसभक्षक पक्षी, कोल्हा, गाढव, उंट, सर्प, यांसारखी वस्त्रछेदाची आकृति देवभागात असली तथापि पुरुषांस मृत्युसारखे भय करते ॥४॥
छत्र, ध्वज, स्वस्तिक, वर्धमान (परीळ इ० मृन्मयपात्र,) बिल्ववृक्ष, कुंभ, कमल, तोरण इ० कांसारखी वस्त्रच्छेदाची आकृति राक्षसभागात असताही पुरुषांस शीघ्र लक्ष्मी प्राप्त होते ॥५॥
अश्निनी नक्षत्रावर नवीन वस्त्र धारण केले तर बहुत वस्त्रे मिळतात. असेच भरणीवर न० व० धा० केले तर वस्त्रहरण, कृत्तिका० वस्त्रदहन, रोहिणी० द्रव्यप्राप्ति ॥६॥
मृग० उंदराचे भय, आर्द्रा० मरण, पुनर्वसु० शुभप्राप्ति, पुष्य० धनप्राप्ति ॥७॥
आश्लेषा० वस्त्रच्छेदन, मघा० मरण, पूर्वा० राजभय, उत्तरा० धनप्राप्ति ॥८॥
हस्त० कर्मसिद्धि, चित्रा० शुभप्राप्ति, स्वाती० शुभभोजन, विशाखा० लोकप्रियता ॥९॥
अनुराधा० मित्रयोग, ज्येष्ठा० वस्त्रनाश, मूळ, जलामध्ये नाश, पूर्वाषाढा० रोग ॥१०॥
उत्तराषाढा० मिष्टान्नप्राप्ति, श्रवण, नेत्ररोग, धनिष्ठा० धान्यप्राप्ति, शततारका० विषभय ॥११॥
पूर्वाभाद्रपदा० उदकभय, उत्तराभाद्रपदा० पुत्रप्राप्ति, रेवती० रत्नप्राप्ति, अश्विन्यादि नक्षत्रांवर नवे वस्त्र धारण करणारास पूर्वोक्त फले होतात ॥१२॥
ब्राम्हाणाज्ञेने, राजाने दिलेले, विवाहविधीमध्ये मिळालेले असे नवीन वस्त्र गुणरहितनक्षत्रादिकीही धारण केले असता, इष्टफल प्राप्त होते ॥१३॥
विवाहकाली, राजाने केलेल्या सन्मार्गी व ब्राम्हाणाची आज्ञा असता, गुणरहितनक्षत्रीही नवे वस्त्र धारण करणे प्रशस्त होय ॥१४॥
॥ इतिबृहत्संहितायांवस्त्रच्छेदलक्ष्णंनामैकसप्ततितमोध्याय: ॥७१॥