बृहत्संहिता - अध्याय १८

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


अथशशिग्रहसमागम:
चंद्र, नक्षत्रांच्या किंवा ग्रहांच्या यथासंभव (समीपस्यांच्या) उत्तरेकडून जाईल तर ते प्रदक्षिणगमन होते. हे मनुष्यास शुभकारक होय. चंद्र दक्षिणेकडून गेला तर तो अशुभ होय ॥१॥

जर चंद्र भौमाच्या उत्तरेकडून जाईल तर पर्वतवासी लोकांचा व बलिष्ठ राजांचा जय होईल. पाथस्थ व क्षत्रिय आनंदित होतील. पृथ्वीवर बहुत धान्य होईल ॥२॥

चंद्र, बुधाच्या उत्तरेकडून जाईल तर नगरस्थ राजांचा जय व सुभिक्षही होईल. धान्याची वृद्धि, लोकांस संतोष. रजांचा कोश (जामदारखाना) यांची वृद्धि करितो ॥३॥

चंद्र, बृहस्पतीच्या उत्तरेकडून जाईल तर, नागरिकजन, ब्राम्हाण, क्षत्रिय, पंडित, धर्म, मध्यदेश यांची  वृद्धि, सुभिक्ष, सर्व प्रजांस आनंद, ही होतात ॥४॥

चंद्र, शुक्राच्या उत्तरेकडून जाईल तर, भांडार, गज, अश्व, यांची वृद्धि होते. शत्रू जिंकण्याची इच्छा करणारे व धनुर्धारी, यांचा जय होतो. धान्यसंपत्तीही उत्तम होते ॥५॥

चंद्र, शनीच्या उत्तरेकडून जाईल तर, नगरस्थ राजांचा जय होईल. शक (यवनविशेष,) बाल्हिक, सिंधुदेशांतील लोक, पल्हव, यवन यांस आनंद होतो ॥६॥

ज्या नक्षत्रांच्या व ग्रहांच्या उत्तरेकडून उत्पातरहित चंद्र जाईल, त्या नक्षत्रग्रहांची प्रागुक्तद्रव्ये, नागरीक लोक, मार्गस्थलोक, पूर्वोक्त भक्तिदेश यांते तो पुष्टै करील. तोच दक्षिणेकडून जाईल तर त्यांच्या नाश करील ॥७॥

ज्या नक्षत्रांच्या व ग्रहांच्या उत्तरेकडून उत्पातरहित चंद्र जाईल, त्या नक्षत्रग्रहांचीं प्रागुक्तद्रव्ये, नागरिक लोक, मार्गस्थलोक, पूर्वोक्त भक्तिदेश यांते तो पुष्ट करील. तोच दक्षिणेकडून जाईल तर त्यांचा नाश करील ॥७॥

चंद्र, ग्रहांच्या उत्तरेकडे असता, जे फल सांगितले ते सर्व दक्षिणेकडे अ. विपरीत होते. याप्रकारेकरून नक्षत्रे व ग्रह यांचे चंद्राबरोबर समागम सांगितले. ग्रह व नक्षत्रे यांबरोबर चंद्राचे युद्ध कधीच होत नाही ॥१८॥


॥ इतिबृहत्संहितायांशशिग्रहसमागमोना माष्टादशोध्याय: ॥१८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-02-19T22:17:22.9500000