बृहत्संहिता - अध्याय १४

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


अथकूर्मविभाग:
कृत्तिकांपासून तीन नक्षत्रांचा १ याप्रमाणे २७ नक्षत्रांचे ९ विभग करून ते भाग या भरतखंडामध्ये मध्यापासून पूर्वादिदिशाक्रमाने नऊ विभागांवर योजिले आहेत ॥१॥

भद्र, अरिभेद, मांडव्य, साल्वनीप, उज्जिहान, संख्यात, मरूभू, वत्सघोष, यामुन, सारस्वत, मस्त्य, माध्यमिक, माथुरक, उपज्योतिष, धर्मारण्य, शूरसेन,  गौरमुख, उद्देहिक, पांडुगुड, अश्वत्थ, पांचाल, साकेत, कंक, कुरु, कालकोटि, कुकुर, पारियात्रपर्वत, औदुंबर, कापिष्ठल, गजाव्हय (हस्तनापुर,) हे सर्व देश भरतखंडाच्या मध्यभागी आहेत म्हणून हे मध्य होय ॥२॥३॥४॥

यानंतर पूर्वदिशेकडचे देश सांगतो. अंजन, वृषभध्वज, पद्म, माल्यवान हे पर्वत; व्याघ्रमुखजन, सुहयादेश,  कर्वटशहर, चंद्रपुरनगरातील लोक, शूर्पकर्णलोक, खस, मगध, शबर, गिरि (शबर पर्वत,) मिथिल, समतट, उड्र, अश्ववदन,  दंतुरक, प्राग्जोतिष, लौहित्यनद, क्षीरोद (हे समुद्र,) पुरुषभक्षक लोक, उदयाद्रि, भद्र, गौडक, पौंड्र, उत्कल, काशि, मेकल,  आंबष्ठ, एकपद, तामलिप्तिक, कोशलक, वर्धमान हे सर्व देश पूर्वेकडे आहेत ॥५॥६॥७॥

आग्नेयदिशेकडे कोशल. कलिंग, वंग, उपवंग, जठरांग, शूलिक, विदर्भ, वत्स, आंध्र, चेदिक, ऊर्ध्वकंठा, वृषस्थान, नालिकेर, चर्मद्वीप,  विंध्यपर्वतावर रहाणारे, त्रिपुरी (नगरी,) श्मश्रुधरजन, हेमकूटयस्थान, व्यालग्रीवजन, महाग्रीवजन, किष्किंधदेश, कंटकस्थल, निषादराष्ट्र, पुरिक, दाशार्ण, नग्नशबर, पर्णशबर, हे सर्व आश्लेषादि त्रिकामधील आहेत ॥८॥९॥१०॥

दक्षिणदिशेकडे लंका, कालाजिन, सौरिकीर्ण, तालिकट, गिरिनगर, मलय, दर्दुर, महेंद्र, मालिंद्य, भरुकच्छ, कंकट, टंकण, वनवासी, शिबिक, फणिकार, कोकण, आभीर, आकरस्थान, (रत्नांच्या खाणी,) वेणा (नदी,) आवंतक लोक, दशपुर, गोनर्द, केरलक, कर्णाट, महाटवी, चित्रकूटपर्वत, नासिक्य,  कोल्लगिरि, चोल, क्रौंचद्वीप, जटाधर, कावेरीतीरस्थ, रिष्यमूक, वैडूर्य, (शंखमुक्ता जेथे उत्पन्न होतात ते,) अतिऋषीचे स्थान, वारिचर, धर्मपत्तनद्वीप, गणराज्य, कृष्णवेल्लूर, पिशिक, शूर्पाद्रि, कुसुमनग,  तुंबवन, कार्मणेयक, दक्षिणसमुद्र, तापसांचे आश्रम, ऋषिकजन, कांची, मरुचपित्तन, चेर्यार्यक, सिंहल, ऋष्भ, बलदेवपत्तन, दंडकावन, तिमिंगिलाशन (जन,) भद्र (भद्रसंज्ञक जन,) कच्छ, कुंजरदरी, ताम्रपर्णी नदी, हे दक्षिणे कडचे देश, उत्तराफल्गुनी इत्यादि त्रिकांतले जाणावे ॥११॥१२॥१३॥१४॥१५॥१६॥

नैऋत्यदिशेकडचे देश, पल्हव, कांबोज, सिंधु, सौवीर, वडवामुख, आरव, आंबष्ठ, कपिल, नारीमुख, आनर्त, फेणगिरी, यवन, माकर, कर्णप्रावेय, पारशव, शूद्र, बर्बर, किरात, खंड, क्रव्याश्य, आभीर, चंचूक, हेमगिरि, सिंधुनद, कालक,रैवतक, सुराष्ट्र, बादर, द्रविड, महार्णव, हे होत हे स्वातीपूर्वक तीन नक्षत्री जाणावे ॥१७॥१८॥१९॥

पश्चिमेकडचे देश. मणिमान (पर्वत,) मेघवान, वनौघ, क्षुरार्पण, अस्तपर्वत, अपरांतक, शांतिक, हैहय, प्रशस्ताद्रि, वोक्काण, पंचनद, रमठ, पारत, तारक्षितिजृंग, वैश्य, कनक, शक, निर्मर्यादग्लेच्छ, हे होत. हे ज्येष्ठादि तीन नक्षत्री जाणावे ॥२०॥२१॥

वायव्यदिशेकडे देश, मांडव्य, तुखार, तालहल, मद्र, अश्मक, कुलूत, लहड, स्त्रीराज्य, नृसिंहवन, खस्थ, वेणुमतीनदी, फल्गुनदी, लुका, गुरुहा मरुकुच्च, चर्मरंग, एकलोचन, शूलिक, दीर्घग्रीव, दीर्घास्य, दीर्घकेश हे होत. हे उत्तराषाढादिक तीन नक्षत्री जाणावे ॥२२॥२३॥

उत्तरदिशेकडील देश. कैलासपर्वत, हिमवान,  वसुमान, धनुष्मान, क्रौंच, मेरु (हे पर्वत,) उत्तरकुरू, क्षुद्रमीन, कैकय, वसाति, यामुन, भोगप्रस्थ, अर्जुनायन, आग्नीध्र, आदर्श, अंतद्वीपि, त्रिगर्त, तुरगानन, अश्वमुख, केशधर, चिपिटनासिक, दासेरक, वाटधान, शरधान, तक्षशिल, पुष्कलावत, कैलावत, कंठधान, अंबर, मद्रक भूतपुर, गांधार, यशोवती (नगरी,) हेमताल, राजन्य, खचर, गव्य, यौधेय, दासमेय. श्यामाक, क्षेमधूर्त, हे होत हे शततारकादि तीन नक्षत्री जाणावे ॥२४॥२५॥२६॥२७॥२८॥

ईशान्यदिशेकडचे देश. मेरुक. नष्टराज्य, पशुपाल, कीर, काश्मीर, अभिसार, दरद, तंगण, कुलूत, सैरिंध, वनराष्ट्र, बम्हापुर, दार्व, डामर, वनराज्य, किरात, चीन, कौणिद, भल्लापलोल, जटासुर, कुनठ, खस, घोष, कुचिक, एकचरण, अनुविश्व, सुवर्णभू, वसुधन दिविष्ठ, पौरव, चीर, निवसन, त्रिनेत्र, मुंजाद्रि, गंधर्व हे होते. हे रेवत्यादि तीन नक्षत्री जाणावे ॥२९॥३०॥३१॥

कृत्तिकादि तीन तीन नक्षत्रवर्ग पापग्रहांनी पीडित असता अनुक्रमाने वक्ष्यमाण राजांचा नाश होतो. कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष ही ३ नक्षत्रे पीडित अ. पांचाल राजा; आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, मागधिकराजा; आश्लेषा, मघा पूर्वा, कालिंगराजा; उत्तरा, हस्त, चित्रा, आवंतराजा; स्वाती, विशाखा, जनुराधा, आनर्तराजा; ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, सिंधुसौवीरराजा; उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, हारहौरराजा; शततातरका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभा., मद्रराजा; रेवती, अश्विनी, भरणी, कौलिंदराजा; हे राजे ही नक्षत्रे रवि, भौम, शनि, या पापग्रहांनी पीडित असता मत्यु पावतात ॥३२॥३३॥


॥ इतिबृहत्संहितायांकूर्मविभागोनामचतुर्दशोध्याय: ॥१४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-02-18T20:10:37.4670000