अलंकारप्रिय, उत्तमरूपवान, भाग्यवान, चतुर, बुद्धिवान असा अश्विनीनक्षत्राच्याठाई जन्मलेला प्राणि होतो. कृतनिश्चय (कार्यांचा शेवट करणारा,) सत्यभाषी, रोगरहित, चतुर, सुखी असा भरणीनक्षत्री जन्मलेला होतो ॥१॥
बहुत भक्षण करणारा, परस्त्रीरत, तेजस्वी, कीर्तिवान असा कृत्तिकानक्षत्री झालेला होतो. सत्यवक्ता, शुद्ध प्रिय बोलणारा, स्थिरबुद्धि, सुरूप असा रोहिणीन० जन्मतो ॥२॥
चंचलबुद्धि, चतुर, भित्रा, कुशल, आनंदी, धनवान, भोगयुक्त असा मृगनक्षत्री झालेला होतो. परकार्याविमुख, गर्वित, क्रोधी, कृतघ्न, हिंसा करणारा, पाणी असा आर्द्रा नक्षत्री झालेला होतो ॥३॥
जितेद्रिय, सुखी, उत्तम स्वभाव, दुष्टबुद्धि, रोगी, तृषार्त, अल्पाने संतुष्ट, असा पुनर्वसुनक्षत्री झालेला मनुष्य होतो ॥४॥
जितेद्रिय, सर्वजनप्रिय, पंडित, धनवान, धार्मिक असा पुष्यनक्षत्री शा० होतो. परकार्य्विमुख, संचय न करणारा, पाणी, दुर्जन, परवंचक, असा आश्लेषानक्षत्री झालेला होतो ॥५॥
बहुतसेवक, बहुतधन, भोगयुक्त, देव व पितर यांचा भक्त, महोत्साह असा मघानक्षत्री झा० हो० प्रियभाषण, दाता, तेजस्वी, भ्रमणशील, राजसेवक, असा पूर्वाफल्गुनीनक्षत्री झालेला होता ॥६॥
सर्वजनप्रिय, विद्येने प्राप्तधन, भोगयुक्त, सुखी असा उ० फ० नक्षत्री झा० हो० आनंदी, धीट, मद्यपानासक्त, निर्दय, चोर असा हस्तनक्षत्री झा० हो० ॥७॥
चित्रवर्णवस्त्र व मालाधारक, सुंदरनेत्र व शरीर, असा चित्रानक्षत्री झा० हो० इंद्रियदमनशील, क्रयविक्रय जाणणारा, कृपाळु, प्रियभाषण, धार्मिक असा स्वातीनक्षत्री झालेला होतो ॥८॥
परवृद्धि न सहन करणारा, लोभी, तेजस्वी, वक्ता, कलहकर्ता, असा विशाखानक्षत्री झालेला होतो. धनी, परदेशी रहाणारा, भुकाळु, भ्रमणशील, असा अनुराधानक्षत्री झालेला होतो ॥९॥
अल्पमित्र, संतुष्ट, धर्मपर, बहुक्रोधवान असा ज्येष्ठान० झा० हो० अभिमानी, धनवान, सुखी, क्रूर नव्हे, स्थिरबुद्धि, भोगयुक्त असा मूलन० झालेला होतो ॥१०॥
आनंद व स्त्री ही प्रिय ज्यास असा, संग्रामशूर, स्थिरमित्र असा पू० षा० न० झा० हो० नम्र, धार्मिक, बहुमित्र, प्रत्युपकारी, सर्वलोकप्रिय असा उ० षा० नक्षत्री झालेला होतो ॥११॥
लक्ष्मीवान, पंडित, उदार आहे स्त्री ज्याची असा, द्रव्यवान, कीर्तियुक्त, असा श्रवणन० झा० हो० दानशूर, अभिमानी, शूर, गायनप्रिय, धनलोभी असा धनिष्ठानक्षत्री झालेला होतो ॥१२॥
निष्ठूरभाषणकर्ता, स्त्रियादिव्यसनी, शत्रूहंता, साहसकर्मकर्ता, दुराराध्य, (कोणी त्याशी स्नेह करू शकत नाही) असा शततारकानक्षत्री झालेला होतो. दु:खी, स्त्रीने जिंकिले आहे धन ज्यांचे असा, कुशल, लोभी असा पू० भा० न० झालेला होतो ॥१३॥
वक्ता, सुखी, पुत्रपौत्रादियुक्त, शत्रूंस जिंकणारा, धार्मिक असा उ० भा० न० झा० होतो. अविकलशरीर, सौभाग्यवान, शूर, पवित्र, द्रव्यवान, असा रेवतीनक्षत्री झालेला प्राणी होतो ॥१४॥
॥ इतिश्रीवरा०बृहत्संहितायांनक्षत्रजातकंनामैकोत्तरशततमोध्याय: ॥१०१॥