बृहत्संहिता - अध्याय २२
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
ज्येष्ठशुक्लपक्षी अष्टम्यादि चार दिवशी वायुधारण होते. त्या दिवशी, मृदु (सुखस्पर्श) व उत्तर, ईशानी, पूर्व या दिशांकडील वायु प्रशस्त होत. तसेच त्या दिवशी स्निग्ध (रखरखीत नव्हेत) अशा मेघांनी आच्छादित आकाश असेल तर ते दिवस प्रशस्त (शुभ) होत ॥१॥
ज्येष्ठशुक्लपक्षीच स्वात्यादि ४ नक्षत्री वृष्टि झाली तर अनुक्रमाने श्रावणादि चार महिन्यांमध्ये वृष्टि होत नाही. (ज्येष्ठशुक्लपक्षी स्वातीनक्षत्री वृष्टि झाली तर श्रावणमासी वृष्टि होत नाही. विशाखा न. भाद्रपदमासी, अनुराधा न. आश्विनमासी, ज्येष्ठा न. कार्तिकमासी वृष्टि होत नाही.) गर्भस्राव झाला असे समजावे ॥२॥
जर त्या पूर्वोक्त धारणा चारही दिवशी एकसारख्या होतील तर शुभ होत व सांतरा: (एकसारख्या) न होतील तर अशुभ होय. चोरभय देणार्या होतात. याविषयीचे वसिष्ठऋषींचे श्लोक सांगतो ॥३॥
विजेनेसहित, जलबिंदुयुक्त, धुळीच्या समुदायानेयुक्त जो वायु त्याने सहित. सूर्यचंद्रांस जे मेघांचे आच्छादन त्याने युक्त अशा ज्या धारणा त्या शुभ होत ॥४॥
उत्तर, ईशानी, पूर्व या दिशांकडे श्रेष्ठ वीज चमकेल तर सर्वधान्यांची वृद्धि होईल ॥५॥
धूळ व उदक यांनी मुलांची क्रीडा; पक्ष्यांचे सुस्वर शब्द व त्यांची धूळ, उदक यांमध्ये क्रीडा; सूर्यचंद्रांस स्निग्ध व फार अशुभ नव्हत अशी खळी, इत्यादि झाले असता सर्व धान्यांची वृद्धि करणारी अशी वृष्टि होईल, असे जाणावे ॥६॥७॥
मेघ स्निग्ध व दाट असून प्रदक्षिणगति म्ह. पूर्वेस असून दक्षिणेस जाणे, दक्षिणेहून पश्चिमेस, पश्चिमेहून उत्तरेस, उत्तरेहून पूर्वेस असे जातील तर सर्वधान्यांची साधक अशी महान वृष्टि होईल असे जाणावे ॥८॥
॥ इतिबृहत्संहितायांवायुधारणानामद्वाविंशोध्याय: ॥२२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2015
TOP