१ ब्रम्हा २ विधाता ३ हरि ४ यम ५ चंद्र ६ स्कंद ७ इंद्र ८ वसु ९ भुजंग १० धर्म ११ ईश १२ सूर्य १३ काम १४ कलि १५ विश्वे हे प्रतिपदादि तिथीचे स्वामी होत ॥१॥
अमावास्येचे स्वामी पितर होत. या तिथीच्याठाई नावासारखी कार्ये करावी. नंदा, भद्रा, विजया, रिक्ता, पूर्णा या प्रकारे तिथी होत. म्ह० १ नंदा, २ भद्रा ३ विजया ४ रिक्ता ५ पूर्णा ६ नंदा ७ भद्रा ८ विजया ९ रिक्ता १० पूर्णा ११ नंदा १२ भद्रा १३ विजया १४ रिक्ता १५ पूर्णा व अमावास्या अशा जाणाव्या ॥२॥
जे कार्य ज्या नक्षत्री करावयाचे ते नक्षत्र न मिळे तर त्या नक्षत्राची देवता पाहून त्या देवतेच्या तिथीस ते कार्य करावे. तसेच करण व मुहूर्त यांच्याठाईही देवतेसारखे कार्या करावे. तसेच करण व मुहूर्त यांचाठाईही देवतेसारखे कार्य सिद्धिकारक होते ॥३॥
१ बव २ बालव ३ कौलव ४ तैतिल ५ गर ६ वणिज ७ विष्टि या करणांचे अनुक्रमाने इंद्र, ब्रम्हा मित्र, अर्यमा, भूमि, लक्ष्मी, यम हे स्वामी होत ॥४॥
कृष्णपक्षी चतुर्दशीच्या उत्तरार्धापासून, उत्तरार्धी शकुनि, अमावास्येच्या पूर्वार्धी चतुष्पात, उत्तरार्धी नाग, प्रतिपदेच्या पूर्वार्धीं किंस्तुघ्न, या चार चरणांचे अनुक्रमाने कलि, वृष, सर्प, वायु हे स्वामी होत ॥५॥
शुभ कार्ये, स्वल्पकालसाध्य, कालांतरी राहणारी, शरीरपुष्टिकारक, अशी कार्ये बवकरणी करावी. धर्मक्रिया व ब्राम्हाणाचे हित अशी बालवकरणी करावी. संप्रीति, मित्रवरण ही कौलवकरणी करावी. जेणेकरून लोकप्रिया होतो ते, आश्रय, गृहकर्म ही तैतिलकरणी करावी ॥६॥
कृषिकर्म, बीजवाप, गृहकर्म, आश्रयासून होणारी, ही गरकरणी करावी. स्थिरकार्ये, वाणिज्यायोग ही वणिककरणी करावी. विष्टिकरणी केलेले कार्य शुभकारक होत नाही; परंतु शत्रूचा घात व विष, अग्नि यांचा प्रयोग ही क्रूरकर्मे सिद्धीस जातात ॥७॥
शरीरपुष्टिकारक, औषध तयार करणे व देणे इ० शकुनिकरणाच्याठाई करावे. मूले (औषधी काढणे) मंत्रप्रयोग इत्यादि, गोकार्ये, ब्राम्हाण व पितर यांच्या उद्देशाने कर्मे, राजकार्ये, ही चतुष्पकरणी करावी. स्थिरकार्ये, क्रूरकर्मे, परधनग्रहण, दुर्भगत्व (सर्वजनद्वेष्यत्व) ही कर्मे नागकरणी करावी. शुभकर्म, पुत्रकाम्यादि इष्टि, शरीरपुष्टिकरण, विवाहादि मंगलकार्यसिद्धि ही किंस्तुघ्नकरर्णी करावी ॥८॥
॥ इतिश्रीवरा०बृहत्संहितायांतिथिकरणगुणानामैकौनशततमोध्याय: ॥९९॥