पद - प्रकट मूळपीठादि भवानी
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : भला जन्म हा तुला )
प्रकट मूळपीठादि भवानी देवि रेणुका सती ।
पाहिली सिंहाद्री पर्वतीं ॥ध्रु०॥
चंद्रवदन मृगनयन विराजे, भ्रुकुटि धनुष्याकृती ।
दृष्टि धरि असुरावर वक्र ती ॥
रत्नजडित शिरिं मुकुट विराजे, कर्णयुगुल हालती ।
गळां हार रत्नांचे डोलती ॥
कंचुकि भरजरि पीत पीतांबर अमर चवर ढाळती ।
भ्रमरवत् सिद्ध अंगणिं लोळती ॥
वर्णिति पंडित गुणगणमंडित खड्गचापशर हातीं ।
अखंडित योगीजन पाहती ॥
चमकति कंकण मुक्तघोष घन नक्षत्रवृंद लाजती ।
चालतां पदिं पैंजण वाजती ॥
विष्णुदास म्हणे दीन जनांची माय सांगुं मी किती ।
जाहली भक्तांची सारथी ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP