मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
काय म्हणावें तुला

पद - काय म्हणावें तुला

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल - अशाश्वत संग्रह )
काय म्हणावें तुला । रेणुके ! कळलें अपेक्षिसी मला ॥धृ०॥
इच्छुनि आशा, कनक धनाची । निष्ठुर झालिस, कठोर मनाची ।
तरि मग कैसीं, दीन जनाची । माय म्हणावें तुला ॥ रेणुके० ॥१॥
दुर्बळ म्हणुनीं लाविसि लोटुन । तरि मग निर्जळ, पायस घोटुन ।
सघृत साखर, बेसन कोठुन । खाई म्हणावें तुला ॥ रेणुके ! ॥२॥
आदरसी ज्या, लाल दुशाला । न मिळे धड पट, पदर उशाला ।
तरि मग आम्ही, दाव कशाला । पाय म्हणावें तुला ॥ रेणुके ! ॥३॥
तूं दिनजननी, अशि तरि कांगे । दीन जनाला, भरसी रागें ।
विष्णुदास म्हणे, तरि कां मागें । जाय म्हणावें तुला ॥ रेणुके ! ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP