पद - आई जगदंबा श्रीमंत
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : दत्त अवधूत अवधूत निराकार. )
आई जगदंबा श्रीमंत कृपाघन मोठी
किती वर्णावी गंभीर गुणांची कोटी ॥धृ०॥
अखंडित गंगासौभाग्य मूळ - पिठवासी
असें घडवेना लावण्य ब्रह्मदेवासी
धन्य जन मातापुरपुण्यक्षेत्ररहिवासी
स्वर्ग - सुखगामी लाविति हात दैवासी
घडिंत घडि मोडी ब्रह्मांडें कोटिच्या कोटी ॥ किती० ॥१॥
भांग, मुजंगनिळवर्णवेणी माथ्याची
नाकीं नथ साजे नक्षत्रतुल्य मोत्यांची
अंगामध्यें खाशी कंचुकी तंग बेताची
दंडिं बाजुबंद, कंकणें खुलतीं हातांचीं
जडित हार कंठीं, नवरत्न मुद्रिका बोटीं ॥ किती० ॥२॥
पितांबर पिवळा, नारळी पदर जरतारी
दिनाची आई झांकुनी शिरावर तारी
भक्त आवडीनें बैसवी कुसुम - कल्हारीं
नाचे गण द्वारीं, एळकोट बोले मल्हारी
योगीजन ध्याती, सन्मुनी जपती जप ओठीं ॥ किती० ॥३॥
सदा आनंदी आनंदी सत्य वचनाची
दर्शनासाठीं सांगुनि धाडी सूचनाचि
कुसंगत तोडी म्हणे विष्णुदास कुजनांची
हाची वर देई आवडी सत्य भजनाची
उपेक्षा न करीं अपराध घालुनी पोटीं ॥ किती० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP