पद - माझे आई
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
अंबाबाई । ये धांवत माझे आई ॥धृ॥
नमो श्रीतुळजापुरवासिनी । नमो चित्कले अविनाशिनी ।
नमो उदयोस्तु नारायणी । अखिल वर देई ॥ ये० ॥१॥
पंडिते तारकाख्य वल्लभे । त्रितापांतके महादुर्लभे ।
अजरामरसुखसौरभे । देसि नरदेहीं ॥ ये० २॥
तुझिया करुणामृतवृष्टिनें । विकसिले सौख्यांकुरसृष्टिनें ।
तरि मजकडे कूर्मदृष्टिनें । विलोकुनि पाही ॥ ये० ३॥
संजीवन कला गुणमंडित । समाधिंत डोलसी, अखंडित ।
जोडुनि कर सुर नर पंडीत । लागती पायीं ॥ ये० ४॥
शरण मी तुला जगन्नायके । प्रार्थना ही माझी आयके ।
म्हणे विष्णुदास जगदंबिके । पाव लवलाही ॥ ये० ५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP