मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
शारदास्तवन

पद - शारदास्तवन

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


श्रीसरस्वती - फल - संभारीं । कला - लतिका अति साजिरी ।
ज्ञानगंगा जे ब्रह्मगिरि । वेष ब्रह्मकुमरीचा ॥१॥
त्रैलोक्य - लावण्य - नगरी । शृंगारश्रीपर्वत - भ्रमरी ।
साहित्यबाणलिंगाचे शिखरीं । विशाळ नदी नर्मदा ॥२॥
प्रमेय पोतासाची रंभा । विद्यामूलपीठ जगदंबा ।
चातुर्य - सौभाग्याची शोभा । कुलस्वामिनी कवीची ॥३॥
नवरसांची मंदाकिनी । महिमें वाटे त्रिभुवनीं ।
त्रैलोक्यातें वरदायिनी । देवत्रया पढियंती ॥४॥
निगम - कामधेनुच्या उदरीं । सार नवनीत दुरीच्या दुरी ।
दोहन - मंथनावांचोनि सत्वरीं । दे अज्ञान बालका ॥५॥
तेच सुवासिनी निर्वाणीं । सौभाग्यदायिनी शुभकल्याणी ।
अर्थखाणी सकळ - सुजाणी । वर सुपाणी याची जे ॥६॥
वीणापुस्तकधारिणी । दुःख दारिद्र्य - परिहारिणी ।
जे पांडित्यदानें सुखकारिणी । ते वंदिली शारदा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP