पद - माझी लाज
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( भैरवी )
माझी लाज तुला जगदंबे । आतां धांवत ये अविलंबे ॥धृ.॥
त्रिभुवननायके, तूं माझी आयके । विनंती कल्पकदंबे ॥ आतां० ॥१॥
बाळ तुझा प्रतिपाळ करी तूं । रेणुके, विश्वकुटुंबे ॥ आतां० ॥२॥
भवसंसारीं भय चिंतेचें । लागलें जाळ वळंबे ॥ आतां० ॥३॥
विष्णुदासा - सम जड तरले । वदुं किती ऐसे अचंबे ॥ आतां० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP