पद - धांव दयाळे
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल - श्रीविधि हरिहर मूर्ति )
धांव दयाळे, अतां रेणुके, संकट पडलें मला ।
तूं दीनाची माय म्हणुन मी, हांका मारितें तुला ॥धृ०॥
या दैवगतीच्या पायीं, बाई परदेशीं मी पडलें दूर ।
आड पडले भवसागर डोंगर, पुर लष्कर इंदुर ॥
कामक्रोध षड्रिपु हे व्याळ जसे, कवटाळिति दर्दुर ।
मज गांजाया या मेल्यांची, काय होती मगदुर ॥
गाय कसाबा हातीं देउनी, कसि रहातिस दुरदुर ।
निष्ठुर हो उनि कां घालिसि धड डोळ्यांमधें शेंदुर॥
चाल - संसारीं सुख मज नाहीं, किति राहुं दुःख साहून ।
किति धीर जीवाला देऊं, किति दिवस वाट पाहून ॥
रात्रंदिन मी तळमळते, किति धाडुं पत्र लीहून ।
म्हणे विष्णुदास तरी गाणें, किति दाऊं नित्य गाऊन ॥
चाल - नको उपेक्षा करुं भेटुनी, पुरवि माझे हेतुला ॥१॥ तूं दीनाची ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP