मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
भूपाळी ४

भूपाळी - भूपाळी ४

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : नियम पाळावे )
निजलिस कायी । उठ लवकर अंबाबाई ॥धृ०॥
तूं निजलिस शाल पांघरुन । गेलीस झोंपिं घुरघुरुन ।
आला काळ जवळ गुरगुरुन । अग आइ, आई ॥ उठ० ॥१॥
हा मनाजी द्वाड गायकी । याला दिली घरचि नायकी ।
हा प्राण घेतो काय कीं । अग आइ, आई ॥ उठ० ॥२॥
तूं आहेस झोंपेच्या भरांत । पहा शिरले चोरटे घरांत ।
माझ्या धडकिच भरली उरांत । अग आइ, आई ॥ उठ० ॥३॥
काम - क्रोधादिक हे मांग । पुष्पांचा मोडिति बाग ।
चहूंकडून लाविली आग । अग आइ, आई ॥ उठ० ॥४॥
सांभाळि अपुलें लेंकरुं । नको माते, उपेक्षा करुं ।
म्हणे विष्णुदास कसें करुं । अग आइ, आई ॥ उठ० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP