पद - नाहीं वक्त रेणुके भला
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
नाहीं वक्त रेणुके भला । माझी करुणा यउं दे तुला ॥
तूं असं म्हणूं नको मला । अतां हाणून लावा याला ॥धृ०॥
धड येत नाहिं बोलतां । एक अक्षर नये लीहितां ।
म्हणे दात खाउनी पिता । अतां० ॥१॥
भाऊ म्हणति रिकामा शिण । याचें काय घेतलें ऋण ।
म्हणे पाठिचीच बहिण । अतां० ॥२॥
अर्थाचि मामि मावशी । कांहिं नाहिं म्हणति यापाशीं ।
आइ म्हणे करुं गत कशी । अतां० ॥३॥
पुढें हात करुन बायको । म्हणे समसम याची नको ।
हा दगड कपाळचा चुको ॥ अतां० ॥४॥
नाहीं अंगांत गुण सरसा । नाहीं हातांत एक पयसा ।
कुणी म्हणेना जवळ या बसा ॥ अतां० ॥५॥
माझा फिरला आहे दिवस । कुणीं घेइना देव नवस ।
अवघेचि करिति वसवस ॥ अतां० ॥६॥
दीन जनाचि तुज आवडी । अशि कीर्ती आहे केवढी ।
तूं म्हणुं नको गोष्ट येवढी ॥ अतां० ॥७॥
म्हणे विष्णुदास तुजकडे । आलें तुजवर हें सांकडें ।
तूं म्हणूं नको हो पलिकडे ॥ अतां० ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP