मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
भूपाळी १

भूपाळी - भूपाळी १

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


सत्वर जागृत व्हावें, उठावें, पहा पहांट झाली ।
कशि जगदंबे ! अंबे ! रेणुके ! तुला झोंप आली ।
किमपिही रात्र नाहिं उरली ॥धृ०॥
जेव्हां अरुण अणि गति उदयाचळिं रविच्या रथाची ।
प्रिय निद्रासुख वाटे तेव्हां ती घडि अमृताची ।
प्रकृती मृदु श्रीमंताची ॥
नीज सर्वथा भंगुं नयेची श्रमुनी निजल्याची ।
आत्महितास्तव परि ऐकियली कथा भारताची ।
व्यासमुनिकविच्या ग्रंथाची ॥
कौंतेयासह वधितों बाळें उद्यां मी पृथेचीं ।
भीष्म म्हणे अशि माझि प्रतिज्ञा नव्हे ही वृथाची ।
जय श्रीहरिविण पार्थाची ॥
युद्धप्रसंगामधें श्रमूनी जरि होती निजली ।
तरि द्रौपदिनें कृष्णाबाई कशि जागी केली ।
गोष्ट तिचि अवघी ऐकियली ॥१॥
भीष्म एकला वैरी परि त्या हरी साहाकारी ।
प्रबल पुण्य पंचराजसुत महा अधीकारी ।
तशासहि भय तें चटकारी ॥
कामादिक षडवैरी मजला गांजिताति भारी ।
अति दुर्बळ खल पाहि एकला मी बहु भिकारी ।
तुझा मी होइन उपकारी ॥
त्याहुनि संकट पडलें म्हणुनी आलों तुझ्या दारीं ।
या समयीं करि करुणा माझी तुला लाज सारी ।
शिण ये तुजविण संसारीं ॥
हांका मारितां कां न बोलसी ? तुझी रीत पहिली ।
केलि उपेक्षा कधिं दीनाची कोणि न पाहियली ।
अशि आण बहुतांनीं वाहिली ॥
पतित मी तूं पतीतपावन जगीं कीर्ति भरली ।
विष्णुदास म्हणे म्हणुन तुझी मीं आस फार धरली ।
पदें जडमतिनें गाईलीं ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP