मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
मी लेकरुं तूं माय

पद - मी लेकरुं तूं माय

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल - अशाश्वत संग्रह )
मी लेकरुं तूं माय । रेणुके ! मी लेंकरुं तूं माय ॥धृ०॥
तूं विश्वाची स्वामिणी मोठी । परि मी जन्मलों तुझ्याच पोटीं ।
यामधें संशय काय ॥ रेणुके० १॥
तुजविण कोणापुढें मुख पसरुं । नको सहसा मज क्षणभर विसरुं ।
मी वासरुं तूं गाय । रेणुके० २॥
ह्रदयभुवनिं मन भ्रमर आनंदल । अवलोकीतां रक्त कमलदल ।
सम कोमल तुझे पाय ॥ रेणुके० ३॥
विष्णुदास म्हणे स्वहित कराया । तूं दीनांचें दुःख हराया ।
जाणसि सर्व उपाय ॥ रेणुके० ४ ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP