मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
कुत्रा

पद - कुत्रा

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : छकड्याची - नियम पाळावे )
कुत्रा गुरगुर करतो द्वारीं । माझी हरणी येइ ना घरीं ॥धृ०॥
या कुत्र्याची आइ चोरटी । याची बाइल बहू तर्कटी ॥
याचीं दहा - पांच कारटीं । मोठीं खादाड, मोठीं
माजरी ॥ माझी० ॥१॥
गेला माजुन हा दांडगा । शिरजोर थोर कोडगा ॥
याला खाइ ना वाघ लांडगा । याच्या दगड पडे ना शिरीं ॥ माझी० ॥२॥
मोठ्या मोठ्याला डसतो बाई । हाडासकट मांस खाई ॥
हा उलथुन जाइ ना खाईं । तोंड घालतो भरल्या घागरीं ॥ माझी० ॥३॥
माझं खाउन मसीं भांडतो । माझं अवघं घर धुंडतो ॥
माझ्या मागं मागं हिंडतो । मला फिरवितो जसि भिंगरी ॥
माझी० ॥४॥
हा ग्रामसिंह माजरा । तुझा सिंह पहातां जरा ॥
मग पळेल निलाजरा । याची टळेल सारी गुरगुरी ॥ माझी० ॥५॥
तूं हरणि रक्षि पाडसा । तुझा कळीकाळावर ठसा ॥
महिषासुर वधिला जसा । हा शत्रु तसा संहारी ॥ माझी० ॥६॥
वेगें सिंहाद्रीवासिनी । आली सिंहावर बैसुनी ॥
म्हणे विष्णुदास हांसुनी । आतां तरलों भवसागरीं ॥ माझी० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP