मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
घनाक्षरी

घनाक्षरी

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


मुळपीठवासिनी श्रीअंबे । आदिमुळमाये जगदंबे ॥
मुळाधारे मुळस्तंभे । मुळारंभे रेणुके ॥१॥
नको साधन धन कांहिं । काम स्तवनाचें नाहिं ॥
तुला रेणुके बाइ । आइ, बोलणें पुरें ॥२॥
क्षमा करणें अन्याय । हाचि क्षमतेचा न्याय ॥
क्षमावंते तुज माय । बहुत काय बोलणें ॥३॥
काय इच्छिसि तें सांग । शक्ति पाहुनिया माग ॥
स्नेहधर्मानें वाग । बये, राग सोडुनि ॥४॥
तुझा धुंडितां गांव । कोठें लागे ना ठाव ॥
म्हणुनि जपतों तुझें नांव । मला पाव रेणुके ॥५॥
करुनि दंडाकृति पृष्ठिं । पाहति मुरडुनिया दृष्टिं ॥
होति साधकजन कष्टि । तुझ्यासाठिं रेणुके ॥६॥
गुहा - पर्वत - नदि - कांठिं । तनू टांगुनि उफराटि ॥
पडुनि कर्माच्या हट्टिं । करिति कोटि साधनें ॥७॥
मंत्रतंत्रांच्या युक्ति । शास्त्र - कविता - व्युत्पत्ति ॥
नव्हे भुक्ति न धड मुक्ति । तुझ्या भक्तिवांचुनी ॥८॥
सकल धर्मांचे बोल । काय बोलुनिया फोल ॥
नये भक्तीचें मोल । ब्रह्मगोल तोलितां ॥९॥
स्वामि पुरुषोत्तम देहि । भक्ति भिक्षामृत देइ ॥
पूर्ण अन्नपूर्णा बाइ । अगे आई रेणुके ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP