पद - भवानी जयजय
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : तुम्हा तो शंकर )
भवानी जयजय जय रेणूके ॥धृ०॥
सगुणकर्ण कुब्जराज कुमारिके, बालिके, अंबिके,
त्र्यंबके, परब्रह्म ब्रह्मांडजननी ॥ जयजय० ॥१॥
धांवे, पावे, अविलंबे, जगदंबे, अंबे, दुर्गे, एकविरे,
सुंदरनयने, प्रसन्नवदने, अजरामर वरदे आनंदे ॥
प्रणवरुप - प्रकाशके । प्रणतक्लेश -- विनाशके ।
विष्णुदासा सदाचरणीं, शरणोद्धारि कृपा करी ॥ जयजय० ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP