मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
नमनपर पद

पद - नमनपर पद

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.

नमो गणराया मंगलमूर्तीं । सकल विबुधगण मंगल गाती ॥धृ०॥
रत्नजडित शिरिं मुकुट विराजे । कुंडलें कानीं हालती ॥१॥
दूर्वांकुरदळ शमिपुष्पांचे । हार गळ्यामध्यें डुलती ॥२॥
शुंडा - दंडित मोदक - मंडित । आयुधें करीं लखलखती ॥३॥
विष्णुदासाचे मनभृंगा । चरणकमल विश्रांती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP